शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 08:30 IST

गुरुवारी सकाळी कल्ली पश्चिमेकडील किसानपथवर दिल्लीला जाणाऱ्या एका खाजगी बसला आग लागली. या घटनेत दोन महिला, एक पुरूष आणि एका मुलाचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका बसला भीषण आग लागली. ही आग मोहनलालगंज परिसरात दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या एका स्लीपर बसला लागली. या अपघातात ५ जणांचा मृ्त्यू झाला. तर बसमध्ये सुमारे ६० प्रवासी प्रवास करत होते. चालकाने काच फोडली, बसमधून उडी मारली आणि पळून गेला. आग इतकी भीषण होती की अवघ्या १० मिनिटांत ती पूर्णपणे जळून खाक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौच्या मोहनलालगंज भागातील किसान पथवर ही घटना घडली, दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या एका खाजगी स्लीपर बसला अचानक आग लागली. बहुतेक प्रवासी गाढ झोपेत असताना हा अपघात झाला. आग इतक्या वेगाने पसरली की अवघ्या १० मिनिटांत संपूर्ण बस जळून खाक झाली.

भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले

बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, धुरामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आग लागताच गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी दारे आणि खिडक्यांकडे धावले, पण ड्रायव्हरच्या अतिरिक्त सीटमुळे मार्ग अडला. अनेक प्रवासी त्यात अडकले,बाहेर पडू शकले नाहीत.मिळालेल्या माहितीनुसार, आग  भीषण होती. ही आग एक किलोमीटर अंतरावरूनही दिसत होती. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले, प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली, पण तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. या अपघातात ५ प्रवासी जिवंत जळाले, या प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही. इतर प्रवाशांना वेळीच बसमधून बाहेर काढण्यात आले.

चालकाची सीट साधी असती तर....

बस चालकाने आधी काच फोडली आणि बसमधून उडी मारून घटनास्थळावरून पळ काढला. अपघातानंतर त्याचा कोणताही पत्ता लागलेला नाही. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. सुरुवातीच्या तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे संभाव्य कारण सांगितले जात आहे, पण फॉरेन्सिक अहवालानंतरच त्याची माहिती मिळेल. ड्रायव्हरची सीट सामान्य असती आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा असता तर कदाचित प्रवाशांचे प्राण वाचले असते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशfireआग