शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

..अशा गुन्हेगारांचे हात कलम करायला हवेत!

By admin | Updated: July 12, 2014 02:05 IST

भारतीय कायद्याने परवानगी दिली असती तर लबाडीने बनावट दस्तावेज करणा:या गुन्हेगारांना मी बोटे कापण्याची आणि हात कलम करण्याचीच शिक्षा ठोठावली असती,

चेन्नई : भारतीय कायद्याने परवानगी दिली असती तर लबाडीने बनावट दस्तावेज करणा:या गुन्हेगारांना मी बोटे कापण्याची आणि हात कलम करण्याचीच शिक्षा ठोठावली असती, असे धक्कादायक मत मद्रास उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने व्यक्त केले.
जमीन खरेदीच्या बनावट कागदपत्रंची सब रजिस्ट्रारकडे नोंदणी करण्यासंबंधीच्या एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्या. एस. वैद्यनाथन म्हणाले, ‘माङया असे वाचनात आले की, इराणमध्ये फौजदारी गुन्ह्यांसाठी तत्काळ शिक्षा देण्याची एक अभिनव पद्धत अलीकडेच सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार चोरी करणा:यांच्या हाताची बोटे कापून टाकण्यासाठी एका यंत्रचा वापर केला जातो. शिराज शहरातील न्यायालयात याचा वापर सुरू करण्यात आला आहे. आता माङयापुढे असलेल्या प्रकरणातसुद्धा बनावट दस्तावेज तयार केल्याबद्दल अजर्दारास अशीच बोटे तोडून टाकण्याची कडक  शिक्षा द्यायला हवी, असे मला वाटते. पण काय करणार? भारतात अशी शिक्षा देण्यास कायद्याची परवानगी नाही ना! सब रजिस्ट्रार कार्यालयाने जमीन खरेदीच्या दस्तावेजांची नोंदणी करण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने केलेल्या याचिकेवर न्या. वैद्यनाथन सुनावणी करीत होते. (वृत्तसंस्था)
 
न्या. वैद्यनाथन पुढे असेही म्हणाले की, दुर्दैवाने आपल्या देशात बनावट कागदपत्रे तयार करणा:यांचे हात कलम करून टाकण्याची शिक्षा देण्याची तरतूद कायद्यांत नाही. कायदा जरब बसेल असा कडक असेल तर या प्रकरणात केली गेली आहेत तशी बेकायदा कृत्ये करण्यास भविष्यात कोणी धजावणार नाही. गरिबांच्या जमिनी बळकावण्यासाठी सब-रजिस्ट्रार कार्यालयातील अधिकारी गुन्हेगारांशी संगनमत करतात, असे प्रस्तुत प्रकरणातून स्पष्ट दिसते.