सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:38 IST2026-01-01T18:37:41+5:302026-01-01T18:38:07+5:30
फास्ट फूडच्या सेवनामुळे मृत्यू झा्ल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात फास्ट फूडच्या सेवनामुळे मृत्यू झा्ल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या चुचैला कलान गावातील १९ वर्षीय विद्यार्थिनी इलमा कुरेशी हिचा दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मेंदूमध्ये गाठी तयार झाल्या होत्या.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, इलमावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले होतं की, फास्ट फूडमध्ये वापरल्या जाणाऱ्या कोबीद्वारे मेंदूत पोहोचलेल्या एका कीड्यामुळे या गाठी तयार झाल्या होत्या. इलमा ही चुचैला कलान गावातील रहिवासी नदीम कुरेशी यांची मुलगी होती. नदीम कुरेशी नोएडामध्ये भंगारचा व्यवसाय करतात.
नदीम कुरेशी यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीला सुमारे महिनाभरापूर्वी डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता. सुरुवातीला उपचार घेतल्यावर तिला आराम वाटला, मात्र काही दिवसांनी पुन्हा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिला नोएडामध्ये आणून एका खासगी रुग्णालयात दाखवण्यात आलं. डॉक्टरांनी तिला एमआरआय आणि सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला.
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
तपासणी अहवालात इलमाच्या मेंदूत गाठी असल्याचं समोर आलं. काही दिवस उपचार घेतल्यावर तिला बरे वाटलं. मात्र, १८ डिसेंबर रोजी एका लग्नासाठी ती गावी आली असता तिची प्रकृती पुन्हा खालावली. नातेवाईकांनी तिला तातडीने दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात नेलं, पण खर्च परवडणारा नसल्याने तिला राम मनोहर लोहिया रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तिची प्रकृती सतत खालावत गेली. तपासणीत इलमाच्या मेंदूतील गाठींची संख्या २० हून अधिक झाली होती. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. "डॉक्टरांच्या मते कोबीमध्ये असलेला कीडा मेंदूत शिरला होता, ज्यामुळे या गाठी झाल्या. इलमा बर्गर आणि नूडल्स यांसारखे पदार्थ आवडीने खायची, ज्यामध्ये कोबीचा सर्रास वापर केला जातो" असं वडिलांनी सांगितलं. सामुदायिक आरोग्य केंद्राचे अधीक्षक डॉ. राहुल कुमार यांनी सांगितलं की, "कोबीमध्ये एक प्रकारचा कीडा असतो, जो शरीरात शिरल्यास आतड्यांमधून मेंदूपर्यंत पोहोचू शकतो आणि तिथे गाठी निर्माण करू शकतो."