वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:41 IST2025-04-22T15:41:10+5:302025-04-22T15:41:35+5:30

Uttar Pradesh Crime News: गेल्या काही दिवसांपासून अनैतिक, विवाहबाह्य संबंधांच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे घडली आहे. येथे एका विवाहित महिलेला भेटण्यासाठी आलेला तिचा प्रियकर खोलीतील एका बॉक्समध्ये कपड्यांखाली लपलेल्या स्थितीत सापडला.

Strange sounds were coming from his sister-in-law's bedroom, his brother-in-law became suspicious, as soon as he opened the door... | वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 

वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 

गेल्या काही दिवसांपासून अनैतिक, विवाहबाह्य संबंधांच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे घडली आहे. येथे एका विवाहित महिलेला भेटण्यासाठी आलेला तिचा प्रियकर खोलीतील एका बॉक्समध्ये कपड्यांखाली लपलेल्या स्थितीत सापडला. त्यानंतर या तरुणाला पकडून या महिलेच्या कुटुंबीयांनी त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले. आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार रात्रीच्या वेळी घरातील एका खोलीमधून अनोळखी पुरुषाचा आवाज येत असल्याने महिलेच्या दिराला संशय आला. त्याने कुटुंबातील इतर व्यक्तींना बोलावून दरवाजा ठोठावला. दरम्यान, या महिलेने दरवाजा उघडण्यापूर्वी आपल्या प्रियकराला खोलीत ठेवलेल्या एका पेटीमध्ये कपड्यांखाली लपवले. अनोखळी व्यक्तीचा खोलीत वावर असल्याचा संशय आल्याने कुटुंबीयानी संपूर्ण खोली शोधून काढली, पण तिथे कुणी आढळून आलं नाही. त्याचवेळी त्यांची नजर खोलीत असलेल्या एका मोठ्या पेटीवर गेली.

संशय आल्याने त्यांनी ही पेटी उघडून पाहिली. तसेच त्यातील कपडे बाहेर फेकले. तेव्हा त्या पेटीमध्ये एक तरुण लपून बसल्याचे दिसून आले. हा तरुण सदर महिलेचा प्रियकर असल्याचे कळताच कुटुंबीयांचा राग अनावर झाला. त्यांनी त्या तरुणाला बेदम मारहाण केली. तेवढ्यात गावातील इतर लोकांनीही तिथे धाव घेत या तरुणावर हात साफ करून घेतले. त्यानंतर या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

आरोपी तरुणाचं नाव अजय असं असून, जेव्हा या महिलेचा पती घराबाहेर असायचा, तेव्हा मी तिला भेटायला यायचो, असे त्याने त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, ही महिला दीर-भावजय आणि सासू-सासऱ्यांसह घरी राहते. ही घटना घडली त्या दिवशी सकाळीच तिचं प्रियकराशी बोलणं झालं होतं. तसेच तिने आज पती घरी नसल्याचे सांगून त्याला भेटायला बोलावलं होतं.

या महिलेने सांगितल्याप्रमाणे हा तरुण रात्री उशिरा तिच्या खोलीत घुसला होता. मात्र रात्री या महिलेचा दीर अचानक पाणी पिण्यासाठी उठल्याने या दोघांचं प्रेमप्रकरण उघडकीस आलं. तसेच कुटुंबीयांनी या तरुणाला पकडून त्याची धुलाई केली. 

Web Title: Strange sounds were coming from his sister-in-law's bedroom, his brother-in-law became suspicious, as soon as he opened the door...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.