२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 20:46 IST2025-11-27T20:44:43+5:302025-11-27T20:46:10+5:30
हा व्हिडिओ बुधवारचा (२६ नोव्हेंबर २०२५) असून, संविधान दिनानिमित्त काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
काँग्रेस नेते तथा माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात अत्यंत विचित्र आणि मोठा दावा केला आहे. काँग्रेसला सत्तेबाहेर करण्याचे षडयंत्र अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए (CIA) आणि इस्त्रायलची गुप्तचर संस्था मोसादने (Mossad) रचल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर, या विदेशी गुप्तचर संस्थांना केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार स्थापन होऊ द्यायचे नव्हते, यामुळे 'तो जनतेचा जनादेश नव्हता,' असेही ते म्हणाले. पीटीआयने त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बुधवारचा (२६ नोव्हेंबर २०२५) असून, संविधान दिनानिमित्त काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
'...तर काँग्रेस २५० जागा जिंकू शकली असती' -
या व्हिडिओमध्ये केतकर दावा करत आहेत की, काँग्रेसने २००४ च्या लोकसभा निवडणुकीत १४५ जागा आणि त्यानंतरच्या निवडणुकीत २०६ जागा जिंकल्या होत्या. जर हा ट्रेंड पुढे चालू राहिला असता तर काँग्रेस २५० जागा जिंकून सहजपणे सत्तेत राहू शकली असती. परंतु, २०१४ मध्ये पक्षाच्या जागा घटून ४४ झाल्या.
केतकर पुढे म्हणाले, 'जर काँग्रेसचे स्थिर किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत परत आले, तर आपल्याला भारतात हस्तक्षेप करता येणार नाही अथवा काही करता येणार नाही, असे वाटत असल्याने, एक संघटना सीआयए आणि दुसरी इज्रायलची मोसाद यांनी हा खेळ केला.
VIDEO | Congress leader Kumar Ketkar on Wednesday claimed that the CIA and the Mossad, the spy agencies of the United States and Israel respectively, had plotted the defeat of the Congress in the 2014 Lok Sabha polls.
— Press Trust of India (@PTI_News) November 27, 2025
Speaking at an event organised by the Congress on the… pic.twitter.com/gDrrlDs5Dx
‘तो लोकांचा जनादेश नव्हता’ -
सीआयए आणि मोसादने निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी भारतीय राज्ये आणि मतदारसंघांचा सविस्तर डेटा गोळा केला. आपद्यादेशातील अनेक मतदारसंघांचे डेटा त्यांच्याकडे आहे. असा दावाही केतकर यांनी केला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याबद्दल काही नाराजी होती, पण केवळ यामुळे काँग्रेसचे संख्याबळ २०६ वरून ४४ वर येऊ शकत नाही. 'तो लोकांचा जनादेश नव्हता,' असे केतकर यांनी म्हटले आहे.