शिलाँग- मेघालयमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कोळशाच्या खाणीत 15 खनिकर्मचारी अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी अभियान राबवलं जातंय. परंतु अद्यापही त्यांना खाणीतून बाहेर काढण्यात यश मिळालेलं नाही. याच मुद्द्याचा आधार घेत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच त्या कोळशाच्या खाणीत अडकून पडलेल्या खनिकर्मचाऱ्यांना वाचवण्याची मागणी राहुल गांधींनी मोदींकडे केली आहे.13 डिसेंबर रोज मेघालयातील एका कोळशाच्या खाणी 15 खनिकर्मचारी अडकून पडले आहेत. राहुल गांधींनी केंद्र सरकारवरही गंभीर आरोप केले आहेत. केंद्र सरकारनं त्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी हाय प्रेशर पंपाची व्यवस्था करण्यास नकार दिला आहे. पंतप्रधानांनी या खनिकर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले पाहिजेत. राहुल गांधी ट्विट करत म्हणाले, पाण्यानं भरलेल्या कोळशाच्या खाणीत गेल्या आठवड्यात 15 खनिकर्मचारी अडकले आहेत. त्यांना त्या खाणीत श्वास घेण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोगीबील सेतूवर कॅमेऱ्यांसमोर पोज देत फिरत आहेत. त्यांच्या सरकारनं त्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी हाय प्रेशर पंप देण्यास नकार दिला आहे.
15 मजूर खाणीत अडकले अन् तिकडे मोदी फोटो काढण्यात दंग- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 17:05 IST
मेघालयमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कोळशाच्या खाणीत 15 खनिकर्मचारी अडकले आहेत.
15 मजूर खाणीत अडकले अन् तिकडे मोदी फोटो काढण्यात दंग- राहुल गांधी
ठळक मुद्देमेघालयमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कोळशाच्या खाणीत 15 खनिकर्मचारी अडकले आहेत.अद्यापही त्यांना खाणीतून बाहेर काढण्यात यश मिळालेलं नाही. त्या कोळशाच्या खाणीत अडकून पडलेल्या खनिकर्मचाऱ्यांना वाचवण्याची मागणी राहुल गांधींनी मोदींकडे केली आहे.