कुंभमेळ्यात मुलायम सिंह यादवांचा बसवला पुतळा; संत, महंतांना संताप अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:23 IST2025-01-13T15:21:32+5:302025-01-13T15:23:48+5:30
Mulayam Singh Yadav statue: प्रयागराज येथील कुंभमेळ्यात समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचा पुतळा लावण्यात आला आहे. त्यावरून संत, महंतांनी संताप व्यक्त केला.

कुंभमेळ्यात मुलायम सिंह यादवांचा बसवला पुतळा; संत, महंतांना संताप अनावर
Maha Kumbh Mela 2025 News: प्रयागराज येथे होत असलेल्या कुंभमेळ्यात माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते स्व. मुलायम सिंह यादव यांचा पुतळा बसवल्याने वादाची ठिणगी पडली आहे. एका शिबीर स्थळी मुलायम सिंह यादव यांचा पुतळा बसवल्याने संत, महंतांनी यावर आक्षेप घेतला आहे. 'मुलायम सिंह यादव हे नेहमी हिंदू विरोधी आणि सनातन विरोधी राहिले आहेत', असे म्हणत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी टीका केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष पुरी म्हणाले, मुलायम सिंह यादव यांचा पुतळा संत, महंतांना दाखवण्यासाठी बसवण्यात आला आहे. हिंदु समुदायातील लोकांची त्यांनी हत्या केली, हे दाखवण्यासाठी हा पुतळा बसवला आहे.
अखिल भारतीय आखाडा परिषदेची भूमिका काय?
"आम्हाला मुलायम सिंह यादव यांच्या पुतळ्याबद्दल आक्षेप नाहीये. ते आमचे मुख्यमंत्री राहिले आहेत. पण, ते लोक (समाजवादी पार्टीचे लोक) आता पुतळा बसवून काय मेसेज देऊ इच्छित आहेत. सगळ्यांना माहिती आहे की, राम मंदिर आंदोलनात त्यांचं काय योगदान होतं?. ते नेहमी हिंदू विरोधी राहिले आहेत. सनातन विरोधी आणि मुसलमानांच्या बाजूने राहिले आहेत", असे महंत रवींद्र पुरी म्हणाले.
जुन्या आखाड्याचे यति नरसिंहानंद यांनीही महंत रवींद्र पुरी यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. या गोष्टीचा अखिल भारतीय आखाडा परिषदेने निषेध करणे हे योग्यच आहे, असे ते म्हणाले.
कुंभमेळ्यात मुलायम सिंह यादव स्मृती सेवा संस्थानाच्या वतीने सेक्टर १६मध्ये शिबीर सुरू करण्यात आले आहे. या शिबीर स्थळी ११ जानेवारी रोजी मुलायम सिंह यादव यांचा दोन ते तीन फुटांचा पुतळा बसवण्यात आला.
समाजवादी पार्टीची भूमिका काय?
कुंभमेळ्यात मुलायम सिंह यादव यांचा पुतळा ठेवण्याबद्दल उत्तर प्रदेशचे विरोधी पक्षनेते आणि समाजवादी पक्षाचे नेते माता प्रसाद पांडे यांनी या पुतळ्याचे अनावरण केले.
श्रद्धेय मुलायम सिंह यादव स्मृति सेवा संस्थान महाकुंभ 2025 में समस्त श्रद्धालुओं का हार्दिक स्वागत
— Jay Mangal Yadav (@MangalYadavSP) January 12, 2025
प्रयागराज कुंभ मेला क्षेत्र में लगे श्रद्धेय मुलायम सिंह यादव स्मृति सेवा संस्थान के शिविर में नेता प्रतिपक्ष
श्री माता प्रसाद पांडेय जी ने नेताजी की प्रतिमा का अनावरण किए !… pic.twitter.com/lnlPg62KEo
ते म्हणाले की, "मुलायमजी, आमचे नेते होते आणि त्यांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक आणि इतर लोकांचे शिबिरात भोजन आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रतिकात्मक रुपात मुलायम सिंह यादव यांची एक छोटी मूर्ती ठेवण्यात आली आहे. कुंभमेळा संपल्यानंतर मूर्ती पक्षाच्या कार्यालयात ठेवण्यात येईल."