शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

सपा-काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून बिघाडी!

By admin | Updated: January 22, 2017 00:42 IST

उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपावरून तूर्त बिघाडी होण्याची चिन्हे असून, काँग्रेसने १२0 जागांची मागणी समाजवादी पक्षाकडे केली आहे.

- मीना कमल, लखनौ

उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपावरून तूर्त बिघाडी होण्याची चिन्हे असून, काँग्रेसने १२0 जागांची मागणी समाजवादी पक्षाकडे केली आहे. मात्र काँग्रेसला ९0 जागाच द्यायला अखिलेश यादव तयार आहेत.त्यामुळे काँग्रेस आपल्या उमेदवारांची यादी उद्या, रविवारी जाहीर करणार आहे. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी ही माहिती देताना सांगितले की, आघाडी होणार की नाही, हे तुम्हाला उद्याच कळेल. अर्थात दोघेही ताणून धरत असले तरी आघाडी दोघांना हवी असल्याचे सध्याचे चित्र आहे.काँग्रेसचा १२0 जागांचा आग्रह जसा कायम आहे, तसेच काही मतदारसंघांसाठीही काँग्रेस प्रयत्नशील आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या अनुक्रमे रायबरेली आणि अमेठीमधील सर्व विधानसभा मतदारसंघांत समाजवादी पक्षाने आपले उमेदवार जजाहीर केले आहेत. तिथे सपाचेच उमेदवार गेल्या वेळी विजयी झाले होते. त्या जागा काँग्रेसला हव्या आहेत. तसेच सपाच्या नेत्या अपर्णा यादव या जेथून निवडून आल्या, त्या जागेवरही काँग्रेस आग्रही आहे आणि ती मिळणार नाही, असे सपाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सपाच्या मेहरबानीवर आपण राहू नये, त्यापेक्षा सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करावेत, असे काही काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला २८ जागांवरच विजय मिळाला. मात्र पक्षाला ११.९ टक्के मते मिळाली होती. सपाशी आघाडी केल्याने ५ ते ८ टक्के मते वाढली, तरी आपल्या आमदारांची संख्या ६0 पर्यंत जाईल, असे काँग्रैसला वाटत आहे. काँग्रेसला जास्त जागा देता नयेत, असे सपा नेते जाहीरपणे म्हणत असले तरी त्या पक्षाच्या मतांवर सपाचीही भिस्त आहे. काँग्रेसची १0 ते ११ टक्के मते आपल्याला सत्तेपर्यंत नेतील, असे समाजवादी पक्षाचे नेते खासगीत बोलून दाखवत आहेत. एकीकडे भाजपा आणि दुसरीकडे बसपा यांना आजच्या स्थितीत तोंड देण्यासाठी काँग्रेसला सोबत घ्यायला हवे, असा मतप्रवास अखिलेश गटामध्ये आहे.मायावती यांची टीकाअखिलेशना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारून काँग्रेसने समाजवादी पार्टीपुढे लोटांगण घातल्याचा आरोप मायावती यांनी केला. काँग्रेस आणि सपात युतीची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बसपात प्रवेश केल्याचा दावाही त्यांनी केला. काँग्रेस पक्ष स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजत असेल, तर त्याने सपासोबत जाऊ नये, असा माझा त्या पक्षाला सल्ला आहे. आपले भविष्य डोळ्यासमोर ठेवून त्यांनी एकतर एकट्याने निवडणूक लढवावी किंवा छोट्या धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी करावी, असे मायावती म्हणाल्या. त्यांच्या पत्तकार परिषदेत मुलायमसिंह यादव यांचे सहकारी अंबिका चौधरी यांनी बसपात प्रवेश केला.