शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

सर्वशक्तिनिशी सार्वभौमत्व जपू

By admin | Updated: November 29, 2015 03:08 IST

भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे. परंतु आपल्या सर्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण लष्करी शक्तीचा वापर करण्यासही देश सज्ज आहे,असे प्रतिपादन तीनही

हासीमारा (पश्चिम बंगाल) : भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे. परंतु आपल्या सर्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण लष्करी शक्तीचा वापर करण्यासही देश सज्ज आहे,असे प्रतिपादन तीनही दलांचे प्रमुख राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी केले.भारतीय वायुसेनेच्या १८ व्या आणि २२ व्या स्क्वाड्रनला राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आले. या दोन्ही स्क्वाड्रनद्वारे उत्कृष्ट मिग २७ विमानाचे संचालन केले जाते. शांतता आणि युद्ध काळातही भारताच्या पूर्वेकडील हवाई सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे.पश्चिम बंगालच्या अलीपूरद्वार जिल्ह्यात भारत-भूतान सीमेजवळ या स्क्वाड्रनचे आधार तळ आहे. भारताच्या ईशान्य सीमेवर पाळत ठेवण्याचे काम हे स्क्वाड्रन करते.वायुसेनेच्या या दोन्ही स्क्वाड्रनला सन्मानित केल्यावर मार्गदर्शन करताना राष्ट्रपती म्हणाले, आमच्या सशस्त्र दलांच्या क्षमतेमुळे जगात भारताचे महत्त्व वाढले आहे. आम्ही शांततेसाठी वचनबद्ध आहोत. मात्र आमच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी आम्ही संपूर्ण शक्ती पणाला लावू आणि लष्करातील आमचे शूरवीर यावेळी एकजूट राहतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. भारतीय वायुसेना म्हणजे देशाच्या लष्करी शक्तीचे वैशिष्ट्य असल्याचे सांगून राष्ट्रपतींनी महिला आणि पुरुष जवानांचे तोंडभरून कौतुक केले. (वृत्तसंस्था)