सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 23:32 IST2025-06-15T23:30:37+5:302025-06-15T23:32:05+5:30

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी प्रकृती अस्वस्थ झाल्याने नवी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात (SGRH) दाखल करण्यात आले आहे.

Sonia Gandhi's health suddenly deteriorates, admitted to Sir Gangaram Hospital | सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल

सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी प्रकृती अस्वस्थ झाल्याने नवी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात (SGRH) दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या माहितीनुसार, त्यांना पोटाच्या त्रासामुळे रुग्णालयात आणण्यात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या काही काळापासून सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत चढ-उतार दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशात त्यांची प्रकृती बिघडली होती, तेव्हा त्यांना शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये (IGMC) नेण्यात आले होते. याशिवाय, फेब्रुवारी महिन्यातही त्यांना पोटाच्या त्रासामुळे सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वारंवार बिघडणाऱ्या प्रकृतीची कारणे

९ जून रोजी सोनिया गांधी (७८) यांची सर गंगा राम रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे एका खासगी भेटीवर असताना त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवला होता, त्यानंतर त्यांना IGMC रुग्णालयात नेण्यात आले. IGMC चे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अमन यांनी शनिवारी सांगितले होते की सोनिया गांधी यांचा रक्तदाब जास्त होता, परंतु इतर सर्व तपासण्या सामान्य होत्या.

गेल्या चार-पाच वर्षांत सोनिया गांधी यांची प्रकृती अनेक वेळा बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना श्वसनाचा त्रास देखील आहे. २०२२ मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यावेळीही त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. सध्या त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून आहे.

Web Title: Sonia Gandhi's health suddenly deteriorates, admitted to Sir Gangaram Hospital