उत्तर प्रदेशातील सोनभद्रमधून एक अत्यंत अजब घटना समोर आली आहे. येथे एक व्यक्ती आपल्या मुलीच्या लग्नासाठी मुलगा पाहण्यास जातो असं सांगून घरातून बाहेर पडतो. मात्र काही दिवसांनी जेव्हा ती व्यक्ती घरी परतली, तेव्हा त्याच्यासोबत एक तरुण मुलगी होती. चौकशीनंतर समजलं की, त्याने तिसरं लग्न केलं आहे. हे पाहून घरातील सर्वच जण अवाक झाले. अखेर हे संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं.
पोलीस ठाण्यातील 'कौटुंबिक सल्ला केंद्रात' पोहोचलेल्या दुसऱ्या पत्नीने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितलं की, २० वर्षांपूर्वी तिच्या पतीने पहिली पत्नी मानसिक आजारी असल्याचं सांगून तिला सोडलं होतं. सध्या त्यांना पाच मोठी मुलं आहेत. तीन महिन्यांपूर्वी पती मुलीच्या लग्नासाठी मुलगा पाहण्याच्या निमित्ताने बाहेर गेला होता, मात्र स्वतःच तिसरं लग्न करून आला आहे. "आता मी काय करू?" असा सवाल पत्नीने केला आहे.
कौटुंबिक सल्ला केंद्रात आलेले हे प्रकरण सोडवणं पोलिसांसाठीही मोठं आव्हान होतं. समुपदेशक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना बराच वेळ यावर विचारमंथन करावं लागलं. विशेष म्हणजे पत्नीला पतीवर फौजदारी गुन्हा दाखल करायचा नव्हता, परंतु तिला या प्रकरणात योग्य कारवाई हवी होती.
बऱ्याच वेळ चाललेल्या चर्चेनंतर अखेर एक तडजोड झाली. पतीने आपल्या तिसऱ्या पत्नीला दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्र ठेवण्याचं मान्य केलं, ज्यावर दोन्ही पक्ष राजी झाले. याच दरम्यान पतीनेही आपल्या दुसऱ्या पत्नीवर चुकीचं वर्तन केल्याचे आरोप केले. पत्नीच्या अशा वागणुकीमुळेच आपल्याला तिसरं लग्न करावं लागलं, असा दावा पतीने केला आहे. सध्या या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.
Web Summary : A UP man, searching for his daughter's groom, returned with a third wife, shocking his family. The second wife sought police help, leading to a settlement where the man agreed to house his new wife separately.
Web Summary : उत्तर प्रदेश में एक व्यक्ति बेटी के लिए दूल्हा ढूंढने गया और तीसरी पत्नी के साथ लौटा, जिससे परिवार हैरान है। दूसरी पत्नी ने पुलिस से मदद मांगी, जिसके बाद समझौता हुआ कि आदमी अपनी नई पत्नी को अलग रखेगा।