शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

कुणी म्हणतंय संकटमोचक, कुणी देवदूत; यूपी पोलिसांची इमेजच बदलली ना भौ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 4:26 PM

नोएडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान केले.

ठळक मुद्देअशा परिस्थितीत मदत मिळवणारे लोक यूपी पोलिसांना अगदी संकटमोचक आणि देवदूत म्हणण्यापासून मागेपुढे पाहत नाहीत.सेक्टर २४ मध्ये असलेल्या ईएसआय रुग्णालयात दाखल असलेल्या गर्भवती महिलेला प्रसूतीदरम्यान रक्त आवश्यक होते

नोएडा - उत्तर प्रदेशपोलिसांची प्रतिमा नेहमीच नकारात्मक मानली जात आहे, परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाउननंतर बदललेल्या परिस्थितीत पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीने आणि त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यानंतर त्यांना देवदूत मानले जात आहे. वास्तविक, गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान, यूपी पोलिसांनी लोकांना सर्वतोपरी मदत केली. अशा परिस्थितीत मदत मिळवणारे लोक यूपी पोलिसांना अगदी संकटमोचक आणि देवदूत म्हणण्यापासून मागेपुढे पाहत नाहीत. दिल्लीला लागून असलेल्या नोएडाचे ताजे प्रकरण आहे. सेक्टर २४ मध्ये असलेल्या ईएसआय रुग्णालयात दाखल असलेल्या गर्भवती महिलेला प्रसूतीदरम्यान रक्त आवश्यक होते, तेव्हा नोएडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान केले.मिळालेल्या माहितीनुसार, अंजुलकुमार त्यागी आणि लाला राम या दोन पोलिसांना महिलेच्या रक्ताची गरज असल्याची माहिती मिळाली तेव्हा दोघांनीही थोडाही विलंब न करता रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रुग्णालयात जाऊन 2 युनिट रक्त दिले, ज्यामुळे त्या महिलेची यशस्वी प्रसूती झाली आणि तिने निरोगी बाळाला जन्म दिला. आता आई व मुल दोघेही सुखरूप आहेत आणि ती महिला रक्तदान करणार्‍या दोन पोलिस अंजुल व लाल राम यांचे आभार मानत आहे.संकटकाळात नोएडा पोलीस लोकांसोबत या संपूर्ण प्रकरणावर एसीपी रजनीश वर्मा यांचे म्हणणे आहे की, माहिती मिळताच पीआरवी महिलेच्या मदतीसाठी पोहोचले आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांनो एक - एक युनिट रक्त देऊन मदत केली. या संकटकाळात पोलीस अनेक प्रकारे मदत करण्यास तयार आहेत. लोकांना ज्या प्रकारची मदत हवी आहे, तशी पोलीस त्या प्रकारची मदत देत आहेत.असे आहे संपूर्ण प्रकरण 

कॉलर विजय कुमारच्या मते, त्याच्या पत्नीची प्रसूती सुखरूप झाली आहे. तिला ईएसआय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे प्रथम रक्ताची गरज भासली आणि त्यानंतर त्यांनी लोकांची मदत घेतली. लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रसार होण्याच्या भीतीने कोणीही रक्तदान करण्यास पुढे आले नाही, त्यानंतर हेल्पलाईन नंबर 112 वर कॉल केला. यानंतर पोलीस अंजुलकुमार त्यागी आणि लाला राम यांनी सेक्टर २४ मधील ईएसआय रुग्णालयात जाऊन रक्तदान केले.४०० किलोमीटरवर जाऊन पोलिसांनी कॅन्सरग्रस्तास दिले औषध

गेल्या आठवड्यात डायल -112 वर शुक्रवारी एकाने ट्विटरद्वारे मदतीसाठी विचारणा केली. त्या ट्विटमध्ये असे म्हटले होते की,  कन्नौजमधील कॅन्सरच्या रुग्णांचे औषध संपले आहे. यानंतर, यूपी पोलीस मदतीसाठी पुढे आले आणि त्यांनी 400 किमी दूर लखनौहून औषध मागितले आणि कॅन्सर रूग्णांपर्यंत पोहोचवले. कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या मुलीला कन्नौजमध्ये औषध मिळू शकले नाही. लॉकडाउनमध्ये लखनौसारख्या मोठ्या शहरात औषधासाठी येणे शक्य नव्हते. यावर औषध पाठविण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली आणि कॅन्सरग्रस्तास वेळीच औषधं मिळाली. 

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशmedicineऔषधंpregnant womanगर्भवती महिलाcorona virusकोरोना वायरस बातम्या