शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

Assam NRC Draft: काहीजणांकडून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 13:29 IST

कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली

नवी दिल्ली : आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन लागू करण्यात आल्यानंतर राजकीय वादंग माजला आहे. यावरुन आज केंद्र सरकारनं संसदेत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. एनआरसीचा अंतिम मसुदा आसाम करारानुसार तयार करण्यात आला असून या माध्यमातून कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही, अशी हमी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एनआरसीचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला आहे. ज्या लोकांची नावं यामध्ये नाहीत, त्यांना त्यांचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुन्हा संधी दिली जाईल, असं राजनाथ सिंह राज्यसभेत म्हणाले. या मुद्यावरुन मुद्दाम वातावरण तापवून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. 'एनआरसीचा अंतिम मसुदा जारी करण्यात आलेला आहे. तो अंतिम एनआरसी नाही. 24 मार्च 1971 च्या आधीपासून राज्यात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या नावाचा समावेश यामध्ये आहे. ज्या व्यक्तींकडे जमिनीची कागदपत्रं, पासपोर्ट, विमा पॉलिसी आहेत, त्यांच्या नावांचा समावेशदेखील एनआरसीमध्ये करण्यात आला आहे. 1971 च्या आधीपासून देशात राहणाऱ्या आणि नंतर आसाममध्ये स्थायिक झालेल्या लोकांनी त्यांच्याकडे असणारी दुसऱ्या राज्यांमधील कागदपत्रं प्रशासनाला द्यावीत,' असं सिंह म्हणाले. आसाम कराराची प्रक्रिया 1985 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना सुरू झाली होती. यानंतर एनआरसी अद्ययावत करण्याचा निर्णय 2005 मध्ये मनमोहन सिंग सरकारच्या काळात घेण्यात आला, असं सिंह यांनी राज्यसभेत सांगितलं. एनआरसीचा अंतिम मसुदा तयार करण्याची प्रक्रिया पारदर्शक आहे आणि त्यामध्ये कोणासोबतही भेदभाव करण्यात आलेला नाही, असं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली नागरिकत्व सिद्ध करणाऱ्या सर्व व्यक्तींचा समावेश एनआरसीमध्ये करण्यात येईल, अशी हमीदेखील त्यांनी दिली. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी