शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

देशातील उद्योग धरताहेत सौर ऊर्जेची कास

By admin | Updated: November 6, 2014 02:46 IST

आपल्या कारखान्यांच्या किंवा कार्यालयीन इमारतींच्या छतावर सौर पॅनेल्स बसवून त्यातून निर्माण होणारी सौर ऊर्जा स्वत: वापरायची व शिल्लक राहिल्यास ग्रीडला विकून चार पैसेही कमवायचे

नवी दिल्ली : राज्य विद्युत मंडळांकडून होणारा बेभरवशाचा वीजपुरवठा व अनियमित पद्धतीने लागू केले जाणारे भारनियमन यातून निदान स्वत:पुरता तरी मार्ग काढण्यासाठी देशातील काही मोठ्या उद्योगांनी आणि संस्थांनी सौर ऊर्जेची कास धरण्यास सुरुवात केली आहे.आपल्या कारखान्यांच्या किंवा कार्यालयीन इमारतींच्या छतावर सौर पॅनेल्स बसवून त्यातून निर्माण होणारी सौर ऊर्जा स्वत: वापरायची व शिल्लक राहिल्यास ग्रीडला विकून चार पैसेही कमवायचे, अशी स्वयंपूर्णतेची योजना आहे. अर्थात असा प्रयोग करणाऱ्यांची संख्या व त्यांच्याकडून निर्माण केल्या जाणाऱ्या सौरऊर्जेचे प्रमाण एकूण देशाचा विचार करता नगण्य असले तरी उद्योगांच्या एकूण अर्थकारणात हा एक अभिनव प्रयोग आहे. विशेषत: सौर पॅनेल्सच्या किमती व ती बसविण्याच्या खर्चात उत्तरोत्तर होत असलेली घट आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांसाठी सरकारकडून देण्यात येत असलेले अनुदान यामुळे अनेक उद्योगांनी या संभाव्य पर्यायाची निदान कागदावर तरी गणिती आकडेमोड करण्यास सुरुवात केली आहे.विशेषत: विनाखंड व खात्रीलायक वीज पुरवठा ही मूलभूत गरज असलेला माहिती तंत्रज्ञान उद्योग (आयटी) या दिशेने विशेष स्वारस्य दाखवीत असल्याचे संकेत आहेत. व्हॅल्यूलॅब्ज ही आयटी कंपनी या मार्गाने जाणारी नवी पाथस्थ आहे. या कंपनीने त्यांच्या हैदराबाद येथील मुख्यालयाच्या इमारतींवर १३ मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता असलेली सौर पॅनेल्सची यंत्रणा उभारण्याचे काम जुलैमध्ये पूर्ण केले. तेथील प्रकाशाची गरज भागविण्यासाठी आणि तीन हजार कर्मचाऱ्यांचे संगणक चालविण्यासाठी एवढी वीज पुरेशी ठरणार आहे.एवढेच नव्हे तर सध्या न लागणारी वीज ही कंपनी ग्रीडला पुरवीत आहे. येत्या काही वर्षांत स्वत:ची विजेची सर्व गरज स्वनिर्मित सौरऊर्जेने भागविण्याची कंपनीची योजना आहे. सध्या उभारलेल्या सौरऊर्जा संयंत्रासाठी कंपनीने एक अब्ज रुपये खर्च केला असून, हा खर्च येत्या आठ वर्षांत भरून निघेल, अशी अपेक्षा आहे.इन्फोसिस लि. या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या आयटी निर्यातदार कंपनीनेही त्यांच्या बंगळुरू येथील कॅम्पसमध्ये ५० मे.वॉ. क्षमतेचे सौरऊर्जा संयंत्र उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यातून कंपनीची ३० टक्के विजेची गरज भागू शकेल. सध्या कंपनी प्रति युनिट ६.१५ पैसे या दराने राज्य विद्युत मंडळाकडून वीज घेते. घसाऱ्याचा हिशेब केला तरी सौरऊर्जा तुलनेने स्वस्त पडेल, असे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)