शहरं
Join us  
Trending Stories
1
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

त्यामुळे इंटरनेटवरून मिटवता येणार नाही ब्ल्यू व्हेल चॅलेंज 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 3:42 PM

ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या आहारी जाऊन काही मुलांनी आत्महत्या केल्यानंतर केंद्र सरकारने  या खेळासंदर्भातील सगळ्या लिंक इंटरनेटवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या लिंक हटवण्यात अपयश आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना दिला आहे. मात्र ब्ल्यू व्हेल चॅलेंजला इंटरनेटवरून हटवता येणार नाही, याची कल्पना सरकारला नसल्याचे चित्र आहे.

 मुंबई, दि. 17 - ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या आहारी जाऊन काही मुलांनी आत्महत्या केल्यानंतर केंद्र सरकारने  या खेळासंदर्भातील सगळ्या लिंक इंटरनेटवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या लिंक हटवण्यात अपयश आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना दिला आहे. मात्र ब्ल्यू व्हेल चॅलेंजला इंटरनेटवरून हटवता येणार नाही, याची कल्पना सरकारला नसल्याचे चित्र आहे. कारण ब्ल्यू व्हेल चॅलेंज ना कुठल्याही वेबसाइटवर आहे ना त्याचे कुठले अॅप आहे.   खरंतर ब्लू व्हेल चॅलेंज ही एक अनेक टास्क्सची मालिका आहे. ज्यामधील अधिकाधिक टास्क्स् हे हिंसक असतात. या गेममध्ये सहभागी होणाऱ्याला 50 दिवसांपर्यंत अॅडमिनिस्ट्रेटरकडून विविध टास्क्स दिले जातात. बऱ्याच्या पौगंडावस्थेतील मुले या गेमला बळी पडतात. सहजपणे जाळ्यात ओढता येतील अशा मुलांना ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या अॅडमिनिस्ट्रेटरकडून हेरले जाते. चाइल्ड पोर्नोग्राफीप्रमाणेच दुसऱ्या दिशेला बसलेल्या व्यक्ती व्हर्च्युअल गप्पांमधून मुलांच्या कमकुवतपणाचा फायदा उठवतात. या चॅलेंज गेमसाठी कुणी मास्टरमाइंड किंवा कुठल्या माध्यमाची गरज नाही. ही एक प्रवृत्ती आहे जी सातत्याने फैलावत आहे.  असा हा मुलांच्या जीवावर बेतत असलेला गेम कुठल्याही वेबसाइट किंवा अॅपवर नसल्याने त्याला पायबंद घालणे आव्हानात्मक ठरणार आहे. ब्ल्यू व्हेल गेमचे पहिले प्रकरण 2015 साली उजेडात आले होते. तेव्हा सुसाइड ग्रुप किंवा डेथ ग्रुप्स या नावाने कुप्रसिद्ध झालेल्या ग्रुप्सनी रशियातील सोशल नेटवर्किंग Vkontakte वर मुलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले होते.  2015 ते 2016 दरम्यान रशियामध्ये सुमारे 130 मुलांनी या चॅलेंजपायी आत्महत्या केल्या होत्या. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने फिलिप बुदेकिन याला अटक केली होती.  

अधिक वाचा ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या सर्व लिंक काढाकेरळमधील मुलाचा ब्लू व्हेल चॅलेंजमुळे बळी?ब्ल्यू व्हेल गेमच्या सर्व लिंक काढून टाका, केंद्र सरकारचा आदेश ब्ल्यू व्हेल म्हणजे एक वेगवेगळे टास्क देणारा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर आहे. ऑर्डर देणारी व्यक्ती अज्ञात असते. एकदा या खेळात लॉग इन केले की तो वेगवेगळे चॅलेंज देतो. साधारणत: ५0 टप्पे ओलांडावे लागतात. या टप्प्याची प्रगती सोप्यापासून अवघड लेव्हलच्या दिशेने होते. शेवटी खेळणाºयाला आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते.  दरम्यान, इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून या गेमची किंवा त्यासंबंधित असलेली लिंक तातडीने हटवावी, असे पत्र इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गुगल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि याहू यासारख्या वेबसाइट्सना काल पाठविले आहे.

टॅग्स :Blue Whaleब्लू व्हेल