Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:01 IST2025-06-12T14:52:37+5:302025-06-12T15:01:36+5:30

Air India Plane Crash Video: गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर येथील निवासी भागात एअर इंडियाचे विमान कोसळले.

Smoke billows in the sky, video of Ahmedabad plane crash surfaced | Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर

Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर

गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये एक मोठा विमानअपघात झालाय. अहमदाबादमधील मेघानी नगर येथील निवासी भागात एअर इंडियाचे विमान कोसळले. हा अपघात उड्डाणादरम्यान झाल्याचं सांगितलं जातंय. या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती

या व्हिडीओमध्ये विमान अपघातानंतर धुराचे लोट उठत असल्याचे स्पष्टपणे दिसतंय. या विमानात २४२ प्रवासी होते. राज्य पोलिस नियंत्रण कक्षाने याची पुष्टी केली आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते, हे विमान टेक ऑफ दरम्यान अहमदाबाद विमानतळाजवळ कोसळले. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

विमानात किती प्रवासी होते?

या अपघाताशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे.यामध्ये विमान अपघातानंतर धूर निघत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, या विमानात २४२ प्रवासी होते.

Web Title: Smoke billows in the sky, video of Ahmedabad plane crash surfaced