मोदींवर चप्पलफेक

By Admin | Updated: May 5, 2014 13:16 IST2014-05-05T13:05:18+5:302014-05-05T13:16:28+5:30

पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर अलाहाबाद येथील सभेदरम्यान एका तरुणाने चप्पल फेकल्याने खळबळ माजली. सभेला उपस्थित असलेल्या मोदी समर्थकांनी त्या युवकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

Slippers at Modi | मोदींवर चप्पलफेक

मोदींवर चप्पलफेक

ऑनलाइन टीम
अलाहाबाद, दि. ५ - पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर अलाहाबाद येथील सभेदरम्यान एका तरुणाने चप्पल फेकल्याने खळबळ माजली. सभेला उपस्थित असलेल्या मोदी समर्थकांनी त्या युवकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. 
रविवारी नरेंद्र मोदींनी अलाहाबाद येथे प्रचार सभा घेतली. मोदी मंचावर बसले असतानाच गर्दीत समोरच्या रांगेत असलेल्या एका तरुणाने मोदींच्या दिशेने चप्पल भिरकावली. मात्र गर्दीपासून मंच खूप लांब असल्याने पुढील अनर्थ टळला. चप्पल फेकल्यावर त्या तरुणाने मोदींविरोधात घोषणाबाजीही केली. मोदींपासून लांब अंतरावर ही चप्पल पडली. या घटनेने सभेठिकाणी काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी त्या युवकाला चोप दिला.यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या युवकाला ताब्यात घेतले. 
चप्पल फेकणा-या युवकाचे नाव तेज प्रताप सिंह असून तो चित्रकूटचा रहिवासी आहे. तेजप्रताप हा अलाहाबाद उच्च न्यायालयात वकिलीची प्रॅक्टीस करतो. पोलिसांनी चौकशीनंतर त्याला सोडून दिल्याचे स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटले आहे. त्याने हे कृत्य का केले हे अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title: Slippers at Modi