शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! ब्रेसलेटमधला मोती गिळला अन् श्वासच थांबला; ६ वर्षांच्या मुलीने शाळेत जीव गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 14:57 IST

पहिलीत शिकणाऱ्या तापसी या ६ वर्षीय चिमुकलीचा मोती गिळल्यामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशच्या बदायूं येथील 'न्यू होप्स पब्लिक स्कूल'मध्ये इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या तापसी या ६ वर्षीय चिमुकलीचा मोती गिळल्यामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तापसीने शाळेत आपल्या हातातील ब्रेसलेटचा मोती तोंडात टाकून चावला आणि तो गिळला, ज्यामुळे तिला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. शाळा प्रशासन आणि नातेवाईकांनी तिला तातडीने स्थानिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात नेलं, परंतु वेळेवर उपचार न मिळाल्याने या चिमुकलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, शाळेचे सीसीटीव्ही फुटेज पाहून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना अलापूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या ककराला भागातील आहे.

घटनेच्या वेळी वर्गात असलेल्या दुसऱ्या एका मुलीने सांगितलं की, तापसीने ब्रेसलेटचा मोती तोंडात टाकला होता. शिक्षिकेने माहिती दिल्यानंतर मुख्याध्यापक भूराज सिंह यांनी पालकांना बोलावलं. तापसीची आजी शाळेत पोहोचल्यानंतर शाळेच्या गाडीतून तिला बदायूं येथील ईएनटी तज्ज्ञांकडे नेण्यात आलं. तिथून तिला सर्जनकडे आणि नंतर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने तिचा जीव वाचू शकला नाही. तापसीचे वडील टेकचंद यांनी शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शाळेचे मुख्याध्यापक भूराज सिंह यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करताना सांगितलं की, ती मुलगी आमच्यासाठीही स्वतःच्या मुलीसारखी होती. शाळा प्रशासनाने तातडीने नातेवाईकांना कळवलं आणि सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार, सत्य समोर येण्यासाठी शाळेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहेत. ते तपासात पूर्ण सहकार्य करत असून शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी उभे आहेत. सध्या पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

अलापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक माधव सिंह बिष्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयातून मेमो मिळाल्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन केलं जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे ही प्रक्रिया पूर्ण होईल. सध्या नातेवाईकांकडून कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार मिळाल्यास आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तथ्यांच्या आधारे एफआयआर (FIR) नोंदवून योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy: 6-Year-Old Dies After Swallowing Bead at School

Web Summary : A 6-year-old girl in Uttar Pradesh died after swallowing a bead from her bracelet at school. She choked, and despite efforts to rush her to the hospital, she could not be saved. Police are investigating; the school is cooperating.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSchoolशाळाStudentविद्यार्थीDeathमृत्यू