काळाचा घाला! अंत्यसंस्कारावरुन परतताना अपघात, 6 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 11:17 IST2018-12-04T11:15:51+5:302018-12-04T11:17:35+5:30

कर्नाटकातील बेळगावमध्ये नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारावरुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (4 डिसेंबर) सकाळी एक भीषण अपघात झाला आहे.

six dies in belagavi road accident | काळाचा घाला! अंत्यसंस्कारावरुन परतताना अपघात, 6 जणांचा मृत्यू

काळाचा घाला! अंत्यसंस्कारावरुन परतताना अपघात, 6 जणांचा मृत्यू

ठळक मुद्देकर्नाटकातील बेळगावमध्ये नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारावरुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची घटना समोर आली. मंगळवारी (4 डिसेंबर) सकाळी एक भीषण अपघात झाला आहे.अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले.

बेळगाव - कर्नाटकातील बेळगावमध्ये नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारावरुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (4 डिसेंबर) सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकक तालुक्यातील हीरेनंदी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या एका कारला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. गंगव्वा हुराली (30), कशव्वा (70), यल्लव्वा पुजारी (45), यल्लव्वा गुंडाप्पानवावर (40), रेनुका सोपडला (35) आणि मल्लवा अशी मृतांची नावे आहेत. दोन्ही वाहनं वेगात असल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 

Web Title: six dies in belagavi road accident