शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

राजस्थानमध्ये स्वपक्षीय आमदारांनी दिला मायावतींना धक्का, केला काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 9:08 AM

बसपाच्या प्रमुख मायावती यांना राजस्थानमधील त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी धक्का दिला आहे.

ठळक मुद्देबसपाच्या प्रमुख मायावती यांना राजस्थानमधील त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी धक्का दिलाराजस्थान विधानसभेतील बसपाच्या सहा आमदारांचा पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश बसपा आमदारांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे राजस्थानमधील अशोक गहलोत सरकार स्थिर

नवी दिल्ली - बसपाच्या प्रमुख मायावती यांना राजस्थानमधील त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी धक्का दिला आहे. राजस्थान विधानसभेतील बसपाच्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राजस्थान विधानसभेतील बसपाच्या गटाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण झाले आहे. राजस्थानमध्ये बसपाचे आमदार आतापर्यंत अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देत होते. मात्र आता आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, असे बसपाच्या एका आमदाराने सांगितले.   

काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले बसपा आमदार जोगेंद्र सिंह अवाना यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, ''बसपाच्या राजस्थान विधानसभेतील सर्व सहा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. इथे आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे आम्ही काँग्रेस सरकारला पाठिंबा देत होतो, तर दुसरीकडे आम्ही त्यांच्याच विरोधात लढत होतो. त्यामुळे आम्ही आमच्या क्षेत्रातील विकासाचा विचार करून, मतदारांच्या हिताचा विचार करून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे."

 बसपाच्या सर्व सहा आमदारांनी राजस्थान विधानसभा अध्यक्षांना यासंदर्भातील एक पत्र पाठवले आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी त्याला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र गुढा( उदयपुरवाटी), जोगेंद्र सिंह अवाना (नदबई), वाजिब अली (नगर), लाखन सिंह मीणा (करोली) संदीप यादव (तिजारा) आणि दीपचंद खेरिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.  दरम्यान, बसपा आमदारांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे राजस्थानमधील अशोक गहलोत सरकार स्थिर झाले आहे. बसपाचे हे आमदार सतत्याने मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या संपर्कात होते, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. सध्या 200 सदस्य असलेल्या राजस्थान विधानसभेमध्ये काँग्रेसचे 100 आमदार आहेत. तर त्याचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकदल पक्षाकडे 1 आमदार आहे. तर 13 अपक्ष आमदारांपैकी 12 आमदारांनी पक्षाला बाहेरून पाठिंबा दिलेला आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेसmayawatiमायावतीAshok Gahlotअशोक गहलोत