भावोजींसोबत मेहुणी फरार, त्रस्त पित्याची पोलिसांत तक्रार; म्हणाले, ‘लाखभर रुपयेही सोबत नेले’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:07 IST2025-11-27T14:06:58+5:302025-11-27T14:07:46+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बांदा शहरामध्ये एक विचित्र घटनासमोर आली आहे. येथील एक तरुणी कथितपणे तिच्या सख्ख्या भावोजीसोबत फरार झाली आहे. या तरुणीने घरातून पळून जाताना घरातून एक लाख रुपयांची रोख रक्कमही पळवून नेल्याचा दावा या तरुणीच्या वडिलांनी केला आहे.

भावोजींसोबत मेहुणी फरार, त्रस्त पित्याची पोलिसांत तक्रार; म्हणाले, ‘लाखभर रुपयेही सोबत नेले’
उत्तर प्रदेशमधील बांदा शहरामध्ये एक विचित्र घटनासमोर आली आहे. येथील एक तरुणी कथितपणे तिच्या सख्ख्या भावोजीसोबत फरार झाली आहे. या तरुणीने घरातून पळून जाताना घरातून एक लाख रुपयांची रोख रक्कमही पळवून नेल्याचा दावा या तरुणीच्या वडिलांनी केला आहे. तसेच पोलिसांनी तपास करून मुलीला शोधून काढावे. अशी विनंतीही त्यांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच लवकर या मुलीचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
ही घटना पैलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून, येथील रहिवासी असलेली एक तरुणी काही दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती. आमच्या मुलीला तिचा सख्खा भावोजी फूस लावून घेऊन गेला, एवढंच नाही तर ही मुलगी घरामधील एक लाख रुपये आणि दागदागिनेसुद्धा सोबत घेऊन गेली, असा असा आरोपी मुलीच्या वडिलांनी केला.
त्रस्त वडिलांनी नातेवाईकांच्या घरांपासून सगळीकडे शोधाशोध केली. मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देत आपल्या मोठ्या जावयाविरोधात तक्रार दिली. आता पोलीस या मुलीचा शोध घेत आहेत.