सिंगल बातम्या

By Admin | Updated: August 11, 2015 00:03 IST2015-08-11T00:03:32+5:302015-08-11T00:03:32+5:30

पानावर लावल्या.....

Single News | सिंगल बातम्या

सिंगल बातम्या

नावर लावल्या.....
विद्यानिकेतनमध्ये मोफत गणवेश वाटप
सोलापूर : साखर पेठ येथील विद्यानिकेतन प्रशालेत अंबुरे प्रतिष्ठानच्या वतीने ५१ गरीब विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए. आय. बागवान होते. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उषा अंबुरे यांच्या हस्ते गणवेश देण्यात आले. यावेळी शेखर चिंचोळी, राजेश महिंद्रकर उपस्थित होते.
वसुंधरा महाविद्यालयात राष्टीय सेवा योजना
सोलापूर : जुळे सोलापूर येथील वसुंधरा कला महाविद्यालयात आज राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. एन. कांबळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. व्ही चौधरी होते. प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत कांबळे यांनी केले. डॉ. अनुराधा लिमकर यांनी परिचय करून दिला. प्रा. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
बुर्ला महाविद्यालयात क्रांतीदिन साजरा
सोलापूर : अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राजेंद्र शेंडगे होते. ते म्हणाले, नीतीमान समाज घडविण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास केला पाहिजे. प्रास्ताविक डॉ. विलास निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन आर. के. वडजे यांनी केले.
वीरशैव माळी समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार
सोलापूर: सोलापूर जिल्हा वीरशैव लिंगायत माळी समाज सेवा मंडळाच्या वतीने समाजातील दहावी, बारावीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, पंचायत समिती सदस्य गुरूसिध्द म्हत्रे, प्रा. बदनोरे, अमिताभ तोडकर, विद्यासागर हिरमुखे आदी उपस्थित होते.

Web Title: Single News