सिंगल क्राईम बातम्या..1

By Admin | Updated: September 6, 2015 23:54 IST2015-09-06T23:54:52+5:302015-09-06T23:54:52+5:30

अज्ञात कारणावरून मारहाण

Single Crime News.1 | सिंगल क्राईम बातम्या..1

सिंगल क्राईम बातम्या..1

्ञात कारणावरून मारहाण
सोलापूर : करमाळा तालुक्यातील देवळाली येथे सुरेश सर्जेराव गोसावी (वय 32), छबुबाई सर्जेराव गोसावी (वय 60) यांना अज्ञात कारणावरून सचिन गायकवाड व इतरांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार शनिवारी दुपारी 3.30 वा. घडला. दोघांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

दारूच्या नशेत जावयाकडून मारहाण
सोलापूर : सिद्धेश्वर साखर कारखाना येथील राहत्या घरी जावई रजाक दस्तगीर शेख याने केलेल्या मारहाणीत इरफानबेगम अजीज मुल्ला (वय 26), शरिफा मेहबूब मुल्ला (वय 45), अन्य एकाला लाकडाने बेदम मारहाण केली. हा प्रकार रविवारी दुपारी 2 वा. घडला. तिघांना उपचारासाठी अजीज मुल्ला यांनी शासकीय रूग्णालयात दाखल केले. सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

Web Title: Single Crime News.1