सिग्नेचर ब्रिजवर अपघाताची मालिका सुरूच, 24 तासांत तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 11:57 IST2018-11-24T11:40:24+5:302018-11-24T11:57:58+5:30

दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर 24 तासांत तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी झालेल्या अपघातानंतर आता शनिवारी (24 नोव्हेंबर) देखील ब्रिजवर एक भीषण अपघात झाला आहे.

signature bridge one man died another injured after their motorcycle skidded | सिग्नेचर ब्रिजवर अपघाताची मालिका सुरूच, 24 तासांत तीन जणांचा मृत्यू

सिग्नेचर ब्रिजवर अपघाताची मालिका सुरूच, 24 तासांत तीन जणांचा मृत्यू

ठळक मुद्देदिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर 24 तासांत तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी झालेल्या अपघातानंतर आता शनिवारी (24 नोव्हेंबर) देखील ब्रिजवर एक भीषण अपघात झाला आहे.अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. 

नवी दिल्ली - दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर 24 तासांत तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी झालेल्या अपघातानंतर आता शनिवारी (24 नोव्हेंबर) देखील ब्रिजवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. 

गाझियाबादचा रहिवासी असलेला शंकर (24) आणि त्याचा मित्र दीपक (17) सिग्नेचर ब्रिजवरून जात असताना बाईक घसरल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र यामध्ये शंकरचा मृत्यू झाला असून दीपक जखमी झाला आहे. 



राजधानी नवी दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर शुक्रवारी (23 नोव्हेंबर) सकाळी मोठी दुर्घटना घडली होती. ब्रिजवर सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुणांचा पुलावरुन कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. बाईकस्वार ब्रिजवरुन जात असताना सेल्फी घेत होते. बाईक चालवताना सेल्फी घेणं दोघांच्याही जिवावर बेतले. सेल्फी घेत असताना त्यांची बाईक दुभाजकाला धडकली आणि दोघंही वाहनासहीत पुलावरुन खाली कोसळले. या भीषण दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या पुलाचं लोकार्पण केले होते.  

Web Title: signature bridge one man died another injured after their motorcycle skidded