धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:41 IST2025-06-08T16:18:24+5:302025-06-08T17:41:54+5:30

गेल्या तीन वर्षांत २०हून अधिक तरुणांशी बनावट विवाह करून त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे लंपास केल्याची धक्कादायक कबुली टोळीतील महिलांनी दिली आहे.

ShockingUttar Pradesh Police Busts "Bride Gang": 15+ Marriages, ₹60 Lakh Loot 20+ Weddings | धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...

धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...

उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. खुलदाबाद पोलिसांनी शनिवारी एका फसवणूक करणाऱ्या 'वधू टोळी'ला अटक केली असून, या टोळीत चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांत २०हून अधिक तरुणांशी बनावट विवाह करून त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे लंपास केल्याची धक्कादायक कबुली टोळीतील महिलांनी दिली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचा प्रमुख उद्देश असा होता की, ते लग्नाची इच्छा असलेल्या आणि विवाह न झालेल्या तरुणांना हेरत. बनावट नातेवाईक, खोटे कागदपत्र आणि नकली घर दाखवून, हे लोक वराच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करत. त्यानंतर नकली विवाह केला जाई आणि विवाहाच्या काही दिवसांतच वधू घरातील सगळ्या मौल्यवान वस्तूंसह गायब होत असे.

राजस्थानपासून प्रयागराजपर्यंतचा फसवणुकीचा प्रवास
या टोळीविरोधात कारवाईची सुरुवात राजस्थानमधील अलवर येथील गोपाल गुर्जर यांच्या तक्रारीनंतर झाली. त्यांनी खुलदाबाद पोलीस ठाण्यात तक्रार केली की, त्यांच्या मुलाची लग्नाच्या नावाखाली १.७५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, पोलिसांनी शहाना (करेली), निशा कुमारी आणि प्रीती देवी (पिपलगाव), ममता भारतीय (झुंसी), आसिफ आणि मोहम्मद जैनुल (शाहगंज), आणि श्रीराम गुर्जर (अलवर, राजस्थान) या सात जणांना अटक केली.

टोळीच्या कारभाराची पद्धत काय?
या 'वधू टोळी'ची कार्यपद्धती विशेष होती. एक सदस्य लग्न इच्छुक तरुणांची माहिती गोळा करायचा, ती माहिती टोळीपर्यंत पोहोचवली जायची. नंतर, टोळीतील महिला वधू म्हणून सादर केल्या जायच्या. त्यांचे नातेवाईक म्हणून टोळीचेच पुरुष सदस्य सहभागी व्हायचे. लग्नानंतर वधू संधी मिळताच पैसे, दागिने घेऊन घरातून पळून जायची.

काही प्रसंगी, वधू ट्रेनने सासरी जात असताना मध्येच उतरून पळून जात असे, तर काही वेळा सासरी पोहोचल्यावर मध्यरात्रीची वेळ साधून गायब होत असे. एवढेच नव्हे तर, वधू परत आली नाही तर तक्रार करणाऱ्यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जायची. 

काय जप्त केलं गेलं?
पोलिसांनी टोळीकडून सहा बनावट आधार कार्ड आणि ३५,००० रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. चौकशीत आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यता असून तपास अधिक खोलवर चालू आहे. पोलिसांच्या तपासानुसार, ही टोळी केवळ प्रयागराज नव्हे तर इतर जिल्ह्यांमध्येही सक्रिय होती. त्यांचा नेटवर्क मजबूत असून, पांढरपेशा वर्तुळातील काहीजणही यामध्ये सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: ShockingUttar Pradesh Police Busts "Bride Gang": 15+ Marriages, ₹60 Lakh Loot 20+ Weddings