धक्कादायक! गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीयकृत बँकांमध्येच अधिक घोटाळे         

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 06:00 AM2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:00:07+5:30

देशातील ७१ हजार ६६१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणांपैकी ६५ हजार ५०९ कोटींचे घोटाळे

shocking! More scams in nationalized banks from past five years | धक्कादायक! गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीयकृत बँकांमध्येच अधिक घोटाळे         

धक्कादायक! गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीयकृत बँकांमध्येच अधिक घोटाळे         

googlenewsNext
ठळक मुद्देनागरी बँक महासंघ : खासगी, परदेशी बँकाही आघाडीवरचनागरी सहकारी बँकींग क्षेत्रात पाच वर्षात १ हजार झाले आहे गैरव्यवहार

पुणे : नागरी सहकारी बँकांमधे गेल्या पाच वर्षांत तब्बल २२० कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याची माहिती विपर्यस्त असून, घोटाळ्यांमध्ये राष्ट्रीयकृत बँकाच आघाडीवर असल्याचे आकडे महाराष्ट्र नागरी सहकारी बँक महासंघाने दिले आहेत. केवळ २०१८-१९ या वर्षांत देशातील ७१ हजार ६६१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणांपैकी ६५ हजार ५०९ कोटींचे घोटाळे राष्ट्रीयकृत बँकातच झाल्याचे महासंघाने सांगितले. 
नागरी सहकारी बँकींग क्षेत्रात पाच वर्षात १ हजार गैरव्यवहार झाले आहे. त्यात २२० कोटींचा घोटाळा झाल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेच्या हवाल्याने प्रसिद्ध झाले आहे. या वृत्ताचे नागरी सहकारी बँक महासंघाने खंडन केले आहे. प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार नागरी बँकींग क्षेत्रात देशपातळीवर १९१८-१९ या वर्षात १८९ प्रकरणांमधे १२७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्यात पुणे स्थित कॉसमॉस बँकेतील सायबर हल्ल्यातील ९४ कोटी रुपयांचा समावेश आहे. मात्र, याला घोटाळा म्हणता येणार नाही. ही रक्कम वजा केल्यास १८० प्रकरणांमधे ३३ कोटी ७० लाख रुपये गुंतले आहेत. सरासरी १८ लाख रुपये प्रत्येक प्रकरणामधे गुंतले आहेत. 
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत राष्ट्रीयकृत बँकामधे ९५ हजार ७०० कोटी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. यातील प्रकरणांची संख्या ५ हजार ७४३ इतकी असून, प्रत्येक प्रकरणामधे सरासरी १७ कोटी रुपये गुंतले आहेत. यात स्टेट बँक ऑफ इंडियाचा सर्वाधिक २५ हजार ४०० कोटी रुपयांचा वाटा आहे. 
गेल्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) राष्ट्रीयकृत बँकांमधील घोटाळा ७१ हजार ५०० कोटी रुपयांचा होता. केंद्र सरकारने त्यांना ७० हजार कोटी रुपयांची भांडवली मदत केली होती. त्यापूर्वीच्या (२०१७-१८) आर्थिक वर्षात घोटाळ््याची रक्कम ४१ हजार १६७ कोटी रुपये होती. केवळ दीड वर्षांत ही रक्कम दुप्पट झाली. राष्ट्रीयकृत, खासगी, परदेशी आणि इतर आर्थिक संस्थांमधील घोटाळ््यांची तुलना केल्यास नागरी सहकारी बँकांचे प्रमाण अल्प ठरते. केवळ नागरी बँकांची प्रसिद्धी देणे योग्य नसल्याचे मत महाराष्ट्र नागरी सहकारी बँक महासंघाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले. 
--
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१८-१९ ची गैरव्यवहारांची जाहीर केलेली आकडेवारी
बँका                          प्रकरणांची संख्या        गुंतलेली रक्कम (कोटीत)        टक्के 
राष्ट्रीय बँका                 ३७६६                                ६४,५०९.                           ९०
खासगी बँका                २०९०                               ५५१५.१०                          ७.६९
परदेशी बँका                 ७६२                                 ९५५.३०                            १.३३
आर्थिक संस्था               २८                                  ५५३.४०                           ०.२१
नागरीबँक                    १८१                                 १२७.७०                            ०.२१
एकूण                          ६८२७                              ७१,६६१.४०                       १००                

Web Title: shocking! More scams in nationalized banks from past five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.