Shocking! BJP MP Manoj Tiwari played cricket without mask in Lockdown hrb | धक्कादायक! लॉकडाऊन तोडत भाजपाचे खासदार मनोज तिवारी क्रिकेट खेळले; ट्रोल झाले

धक्कादायक! लॉकडाऊन तोडत भाजपाचे खासदार मनोज तिवारी क्रिकेट खेळले; ट्रोल झाले

कोरोना संकटामुळे देशभरात लॉकडाऊन वाढविण्यात आहे. याकाळात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचना पालन करण्यास सांगण्यात आले आहे. भाजपाचेदिल्ली प्रदेशाध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी हे दिल्ली सरकारवर रोज टीका करत असून स्वत: लॉकडाऊनचे नियम तोडत आहेत. 


मनोज तिवारी हे रविवारी सोनिपतच्या गन्नौर येथे क्रिकेट खेळताना दिसले. मास्क न घालता ते क्रिकेट खेलत होते. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगही पाळलेले नाही. क्रिकेट मॅच खेळताना त्यांनी तेथे उपस्थित लोकांसाठी गाने गायले. ही क्रिकेट मॅच खेळतानाचा व्हिडीओ तिवारी यांनीच ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे. यावर त्यांनी लिहिले आहे की, देव सर्वांची खेळ भावना भरभरून ठेवुदे. सर्व निरोगी राहुदे, सर्वांची इम्युनिटी चांगली राहुदे. 


तिवारी यांच्या या लॉकडाऊन तोडल्याची चर्चा रंगल्यानंतर सोनिपत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे. तर या प्रकरणी मनोज तिवारींकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या प्रकरणावरून तिवारी सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. 

तिवारी हे युनिक क्रिकेट स्टेडिअमवर आले होते. यावेळी त्यांनी एका टीमसोबत मॅचही खेळली. यावेळी त्यांनी ९ चौकार आणि २ षटकार खेचत ६७ रन बनविले आणि झेलबाद झाले. या मॅचमध्ये त्यांनी गोलंदाजीही केली. मात्र, खेळताना त्यांनी मास्क घातला नव्हता. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

कंगाल पाकिस्तानला कोरोना पावला; 'या' देशाकडून लाखो डॉलरची मदत

भन्नाट! सहा कॅमेऱ्यांचा Redmi K30i 5G लाँच; किंमतही आवाक्यात

व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली

CoronaVirus कोरोनामुळे जग बुडाले पण फेसबुकद्वारे जोडणारा झकरबर्ग मालामाल झाला

CoronaVirus अडेलतट्टू चीन नरमला; तातडीने कोरोना जन्माच्या तपासाला तयार झाला

चीनला हादरा! इकडे भारतावर दादागिरीचे प्रयत्न; तिकडे हाँगकाँग निसटण्याच्या बेतात

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking! BJP MP Manoj Tiwari played cricket without mask in Lockdown hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.