पत्नीच्या मृत्यूचा धक्का, पतीने सोडले प्राण; एकत्रच निघाली दोघांची अंत्ययात्रा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 16:58 IST2025-10-05T16:57:35+5:302025-10-05T16:58:12+5:30
आई-वडिलांच्या मृत्यूने मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला..!

पत्नीच्या मृत्यूचा धक्का, पतीने सोडले प्राण; एकत्रच निघाली दोघांची अंत्ययात्रा...
UP News:उत्तर प्रदेशातील झाशीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आयुष्यभर एकमेकांना साथ देणऱ्या पती-पत्नीने मृत्यूनंतरही साथ सोडली नाही. आधी पत्नीचा मृत्यू झाला, तर १२ तासांनंतर पतीनेही जग सोडले. पती-पत्नीच्या मृत्यूनंतर दोघांची एकदाच अंतयात्रा निघाली आणि एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने कुटुंब आणि स्थानिक रहिवाशांना अश्रू अनावर झाले होते.
सविस्तर माहिती अशी की, रामरतन गुप्ता (76), आपली पत्नी रामदेवी गुप्ता (70) आणि कुटुंबासह झाशी जिल्ह्यातील गरौठा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या इंद्रनगर येथे राहत होते. रामरतन आणि रामदेवी यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याची ५० वर्षे आनंदाने घालवली. मात्र, शनिवारी(4 ऑक्टोबर) सकाळी अचानक रामदेवी यांचे निधन झाले. हे कळताच नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य जमले.
कुटुंबाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली. कुटुंबातील सर्व सदस्य आल्यावर अंत्यसंस्कार होणार होते. मात्र, रात्री पती रामरतन यांचेही रात्री निधन झाले. आई-वडिलांच्या मृत्यूने मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अखेर दुःख सावरत कुटुंबाने दोघांची एकत्रच अंत्ययात्रा काढली आणि विधीनुसार अंतिम संस्कार करण्यात आले. जेव्हा त्यांच्या अंत्ययात्रा एकत्रच उचलण्यात आल्या, तेव्हा कुटुंबासह स्थानिकांना अश्रू अनावर झाले होते.