लग्नानंतर पहिल्याच रात्री धक्का; टक्कल लपवणाऱ्या पतीचे सत्य उघड, पत्नीचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:45 IST2026-01-06T13:45:13+5:302026-01-06T13:45:44+5:30
पतीला टक्कल पडली होती. तो विग वापरत होता, लग्न ठरत असताना त्याने विग वापरले होते.

लग्नानंतर पहिल्याच रात्री धक्का; टक्कल लपवणाऱ्या पतीचे सत्य उघड, पत्नीचा मोठा निर्णय
लग्न हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण आहे. असेच नोएडा मध्ये एका तरुणाचा आणि तरुणीचा विवाह झाला. लग्नाच्या मंडपात सात फेरे घेताना कोणीही विचार केला नव्हता हे नाते फक्त काही दिवसांचे असणार. वधूने ज्याला आपला जीवनसाथी निवडले, त्याने सत्य लपवले होते. ही घटना ग्रेटर नोएडा येथील आहे.
पतीला टक्कल पडली होती. तो विग वापरत होता, लग्न ठरत असताना त्याने विग वापरले होते. नाते तुटल्यानंतर अनेक आरोप केले. टक्कलपणा लपवून लग्न करणाऱ्या पतीने नंतर केवळ तिला छळलेच नाही, तर तिच्या खाजगी फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून पैसेही घेतले. विरोध केल्यानंतर मारहाण आणि घरातून हाकलून दिले. आता ही घटना बिसरख पोलीस ठाण्यात पोहोचली आहे, तिथे पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गंभीर कलमांत गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचे लग्न नवी दिल्ली प्रताप बाग येथील एका युवकाशी ठरले होते. नाते कौटुंबिक पातळीवर ठरले, संवाद झाला, भेटी झाल्या, त्या तरुणाने संशय येईल असे काही केले नाही. लग्न पूर्ण रीतीरिवाजांसह झाले. लग्नादरम्यान देखील पतीने विग लावली होती, त्यामुळे कोणालाही त्याच्या खऱ्या स्थितीचा अंदाज आला नाही, असा दावा पत्नीने केला.
पीडितेच्या आरोपानुसार, लग्नानंतर ज्यावेळी ती सासरी पोहोचली, त्यावेळी पत्नी पतीसोबत बेडरुमममध्ये बसली होती. त्यावेळी तिला सत्य कळाले, आपल्या जोडीदाराने तिला फसवल्याचे लक्षात आले. हे फक्त टक्कलचा नव्हते, तर जाणूनबुजून केलेली फसवणूक होती. तिने ज्यावेळी या विषयावर प्रश्न विचारले आणि नाराजी व्यक्त केली, त्यावेळी पतीने वाद सुरू केला.
यावेळी पत्नीने वाद सुरू केला. त्यावेळी शांत दिसणारा पती आक्रमक झाल्याचे पत्नीने सांगितले. हळूहळू सासू-सासरे आणि इतर नातेवाईक देखील पतीच्या बाजूने उभे राहिले. तिला असे सांगून गप्प करण्यात येऊ लागले की आता लग्न झाले आहे आणि तिला कोणत्याही परिस्थितीत हे नाते निभावावे लागेल. विरोध केल्यावर टोमणे, अपमान आणि धमक्या देण्यात आल्या.
मोबाइलद्वारे दिली धमकी
या प्रकरणात सर्वात गंभीर आरोप ब्लॅकमेलिंगबाबत लावण्यात आले आहेत. पीडितेच्या माहितीनुसार, पतीने तिच्या मोबाइल फोनवरून तिचे अनेक खाजगी फोटो काढले. नंतर याच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर पैसे देण्याचा दबाव आणला. पती वारंवार म्हणत होता की जर तिने पैसे दिले नाहीत तर तिचे फोटो नातेवाईकांना आणि इंटरनेटवर टाकले जातील, असा आरोप तिने केला. या भीतीमुळे ती मानसिकदृष्ट्या खचून गेली.
विरोध केला तर मारहाण
ज्यावेळी तिने पैसे देण्यास नकार दिला आणि ब्लॅकमेलिंगचा विरोध केला, त्यावेळी तिच्यावर मारहाण करण्यात आली. तिला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे छळण्यात आले. या उत्पीडनात पती एकटा नव्हता. सासू-सासरे आणि इतर नातेवाईक देखील यात सहभागी होते.
१५ लाखांचे दागिने हिसकावल्याचा आरोप
काही दिवसांपूर्वी सासरच्या लोकांनी तिच्याकडून सुमारे १५ लाख रुपयांचे दागिने हिसकावून घेतले. विरोध केल्यावर तिच्यावर मारहाण करण्यात आली आणि मग तिला घरातून हाकलून देण्यात आले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती त्यावेळी पूर्णपणे असहाय्य झाली होती. मायकेकडूनही तिला नातेसंबंध जपण्याचा सल्ला दिला जात होता, परंतु परिस्थिती इतकी बिघडली होती की तिथे राहणे तिच्यासाठी शक्य नव्हते. यामुळे तिने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला.