शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

...तर जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नाही- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 11:47 AM

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

नवी दिल्लीः शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. लोकसभा नव्याने अस्तित्वात आली आहे. त्यामुळे आता राम मंदिराचं काम मार्गी लागेल, अशी आशाही संजय राऊत यांनी व्यक्त केली. मला असं वाटतं आता राम मंदिराच्या कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. पण जर असं झालं नाही, तर देशातील जनता आमच्यावर विश्वास ठेवणार नाही.भाजपाकडे 303 खासदार आहेत, शिवसेनेकडे 18 खासदार आहेत. तर एनडीएकडे 350हून अधिक संख्याबळ आहे. त्यामुळे राम मंदिर पुनर्निर्माणासाठी आणखी काय हवं आहे, तरीही यंदाच्या निवडणुकीत राम मंदिर पूर्णत्वास गेलं नाही आणि तिसरी निवडणूक या मुद्द्यावरून लढावयास लागली तर जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नसल्याचा उल्लेखही संजय राऊत यांनी केला आहे. एनडीएमध्ये भाजपानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा दावा आहे. ती आमची मागणी नाही, तर तो आमचा नैसर्गिक अधिकार आहे. लोकसभेचे उपाध्यक्षपद हे आम्हालाच मिळालं पाहिजे, असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे हे पद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास भावना गवळींना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भावना गवळी या शिवसेनेच्या अनुभवी खासदार आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून सलग तीनदा त्यांनी खासदार होण्याचा मान मिळवला आहे, लोकसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भावना गवळी यांना यंदा मंत्रिपद मिळण्याचा अंदाज बांधला जात होता. पण शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या एकमेव मंत्रिपदाची माळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या गळ्यात टाकली. त्यामुळे साहजिकच भावना गवळी नाराज झाल्याचीच चर्चा होती. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९