शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

...तर इतर रेजिमेंटचे जवान सीमेवर तंबाखू मळत होते का?; मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर शिवसेनेचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 14:32 IST

पंतप्रधान मोदींनी बिहार रेजिमेंटचे कोतुक केल्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार रेजिमेंटची प्रशंसा केली होती.सर्व रेजिमेंट देशाच्या असतात. त्या कुण्या एका प्रांत, राज्य अथवा धर्माच्या नसतात - राऊत केवळ एकाच रेजिमेंटचे नाव घेणे, एका राज्याचे नाव घेणे, हे राष्ट्रीय अखंडता आणि एकात्मतेसाठी योग्य नाही - राऊत

मुंबई : गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाष्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जबरदस्त हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चकमकीनंतर, बिहार रेजिमेंटची प्रशंसा केली होती. यावर संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया देत, 'त्या' जवानांनी शौर्य दाखवले, तर इतर रेजिमेंटचे जवान काय सीमेवर तंबाखू मळत होते का?' असा सवाल केला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'बिहार रेजिमेंट’ने लडाखच्या गलवान खोऱ्यात शौर्य दाखवले. तर मग, महार, मराठा, राजपूत, शिख, गोरखा आणि डोगरा रेजिमेंट सीमेवर तंबाखू मळत बसल्या होत्या का? महाराष्ट्राचा वीर पुत्र सुनील काळे यांना काल पुलवामामध्ये वीरमरण आले. मात्र, बिहारमध्ये निवडणुका असल्याने लष्करात ‘जात’ आणि ‘प्रांत’ यांचे महत्व सांगितले जात आहे. अशा प्रकारचे राजकारण कोरोनापेक्षाही घातक आहे!, असे संजय राऊत म्हणाले.

'प्रत्येक रेजिमेंट देशाची' -माध्यमांशी बोलताना राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला, पंतप्रधान मोदींनी बिहार रेजिमेंटचे कोतुक केल्यावरून त्यांच्यावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, लष्कराची कोणतीही रेजिमेंट केवळ रेजिमेंटच असते. प्रत्येक रेजिमेंटची आपली एक परंपरा आणि गाथा आहे. सर्व रेजिमेंट देशाच्या असतात. त्या कुण्या एका प्रांत, राज्य अथवा धर्माच्या नसतात.

निवडणुकीमुळे घेतले गेले नाव -राऊत म्हणाले, राजपूताना रेजिमेंट, शिख रेजिमेंट, महार रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, गोरखा आणि डोगरा रेजिमेंट आहेत. परंपरेनुसार या रेजिमेंट्सचे नाव असते. केवळ एकाच रेजिमेंटचे नाव घेणे, एका राज्याचे नाव घेणे, हे राष्ट्रीय अखंडता आणि एकात्मतेसाठी योग्य नाही. केवळ बिहारमध्ये निवडणुका आहेत, म्हणून बिहारचे नाव घेतले जात आहे. गलवान खोऱ्यात संपूर्ण देशाचे जवान आहेत. ज्यांना हौतात्म्य येते, ते देशाचे जवान आहेत. राष्ट्राची आत्मा आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या -

India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'

चीनच्या दादागिरीला भारताचं चोख उत्तर, टक्कर देण्यासाठी तयार केलं जबरदस्त 'चक्रव्यूह'

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे चीनला झोंबली मिर्ची; ...तर अमेरिका अन् रशियाही कामी येणार नाही, भारताला दिली धमकी

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबईNarendra Modiनरेंद्र मोदीSoldierसैनिक