शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या विरोधात लढणार शिवसेना

By admin | Updated: September 16, 2016 00:57 IST

भाजपबरोबर युती न करता भाजप विरोधकांशी हातमिळवणी करून उत्तर प्रदेश, गुजरात व गोव्यात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सत्ताधारी आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेने चालवली आहे

सुरेश भटेवरा , नवी दिल्लीभाजपबरोबर युती न करता भाजप विरोधकांशी हातमिळवणी करून उत्तर प्रदेश, गुजरात व गोव्यात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सत्ताधारी आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेने चालवली आहे, अशी माहिती सेनेच्या विश्वासार्ह सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.उत्तर प्रदेशात जमिनीस्तरावर काम करून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम शिवसेनेने चालवले आहे. गुजरातमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे समर्थक असलेल्या हार्दिक पटेलांशी शिवसेनेची चर्चेची तयारी आहे तर गोव्यात संघाच्या राज्य प्रमुखपदावरून बाहेर पडलेल्या सुभाष वेलिंगकरांशी युती करण्याच्या चर्चेत उभयतांमध्ये बरीच प्रगती झाली आहे. वेलिंगकरांना केवळ गोवाच नव्हे तर अन्य राज्यातील स्वयंसेवकांचाही पाठिंबा मिळतो आहे, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये हिंदुत्वाच्या मुद्यावर तर गोव्यात स्थानिक भाषेच्या मुद्यावर आगामी निवडणूक लढवणार असल्याचे संकेत शिवसेनेच्या विश्वासार्ह सूत्रांनी दिल्लीत व्यक्त केले असले तरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी मात्र या दोन राज्यात भाजपशी युती न करण्याचे अथवा उत्तर प्रदेश आणि गोव्यात भाजपला पाठिंबा देण्याचे यापैकी कोणतेही संकेत अद्याप दिलेले नाहीत किंवा या मुद्यावर अधिकृतरीत्या भाष्यही केलेले नाही.