...तिने मुलींच्या शिक्षणासाठी दिले 51 लाख रुपये

By Admin | Updated: May 19, 2016 14:47 IST2016-05-19T14:47:32+5:302016-05-19T14:47:32+5:30

सामाजिक कार्यकर्ता निशीता राजपूतने मुलींच्या शिक्षणासाठी तब्बल 51 लाख रुपये दिले आहेत

She has given Rs 51 lakh for girls' education | ...तिने मुलींच्या शिक्षणासाठी दिले 51 लाख रुपये

...तिने मुलींच्या शिक्षणासाठी दिले 51 लाख रुपये

>ऑनलाइन लोकमत - 
वडोदरा, दि. 19 - सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देताना अनेकदा मर्यादादेखील घातल्या जातात. मात्र निशीता राजपूतने मुलींच्या शिक्षणासाठी तब्बल 51 लाख रुपये दिले आहेत. निशीता राजपूत सामाजिक कार्यकर्ता असून गरिब मुलांच्या शिक्षणासाठी काम करते. गरिब मुलींची फी भरण्यासाठी तिने ही 51 लाखांची रक्कम दिली आहे. 
 
निशीता आपल्या कामाचं श्रेय आपल्या वडिलांना दिलं आहे. निशीता गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यात सहभाग घेत असून वडिलांच्या मदतीने गरिब मुलांच्या शिक्षणासाठी देणगीच्या माध्यमातून चेक जमा करत आहे. देणगीच्या माध्यमातूनचं निशीतीने ही 51 लाखांची रक्कम उभारली होती.
 

Web Title: She has given Rs 51 lakh for girls' education