शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 20:46 IST

कोलकात्यातील साउथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये २५ जून रोजी एका २४ वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराने पश्चिम बंगालमधील राजकारण ...

कोलकात्यातील साउथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये २५ जून रोजी एका २४ वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराने पश्चिम बंगालमधील राजकारण जबरदस्त तापले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकार टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहे. यातच आता, या प्रकरणावरून तृणमूल काँग्रेसचे दोन खासदार कल्याण बॅनर्जी आणि महुआ मोइत्रा आपसात भिडल्याचे दिसत आहे. त्यांच्यातील हा वाद आता थेट त्यांच्या खासगी आयुष्यापर्यंत पोहोचला आहे. 

कल्याण बॅनर्जी यांनी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून थेट तृणमूल काँग्रेसविरोधाच (TMC) विधान केले होते. मात्र, हे कल्याण बॅनर्जी यांचे वैयक्तीक विचार असल्याचे पक्षाने म्हटले होते. यावर, महुआ मोइत्रा यांनी कल्याण बॅनर्जी यांच्या विधानाचा निषेध केला. यानंतर, आता कल्याण बॅनर्जी यांनी मुहआ यांच्यावर पलटवार केला आहे. काय म्हणाले, कल्याण बॅनर्जी? -महुआ मोईत्रा यांच्या पिनाकी मिश्रा यांच्यासोबतच्या लग्नावर टीका करताना कल्याण बॅनर्जी म्हणाले, "महुआ हनिमूनवरून परतल्या आणि थेट माझ्याशी भांडायला आल्या. त्या मला महिलाविरोधी म्हणत आहे. पण सत्य हे आहे की, महुआ यांनी त्यांचे ४० वर्षांचे लग्न मोडून. ६५ वर्षांच्या पुरुषासोबत लग्न केले. ज्या महिलेचे घर त्यांनी तोडले, त्या महिलेला वाईट वाटले नसेल?

कोलकाता सामूहिक बलात्कारावरून उपस्थित केला होता सवाल -तत्पूर्वी कोलकाता सामूहिक बलात्कारासंदर्भात भाष्य करताना कल्याण बॅनर्जी यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर प्रश्न उपस्थित केला होता. "TMC चे काही नेते अशा प्रकारच्या गुन्हेगारांना वाचवण्यात मदत करतात. निशेषतः 2011 नंतर, सत्तेत आलेल्या नेत्यांचे नावही अशा गुन्ह्यात समोर येते, असे कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले होते. 

मुहआ यांनी दिली पक्षाची साथ -कल्याण बॅनर्जी यांच्याशिवाय, TMC खासदार मदन मिश्रा यांनीही संबंधित सामूहिक बलात्कार प्रकरणावर वादग्रस्त विधान करत, "जर पीडिता कुणालाही न सांगता एकटीच कॉलेजला गेली नसती," असे म्हटले होते. कल्याण बॅनर्जी आणि मदन मिश्रा यांच्या विधानांपासून तृणमूल काँग्रेसने स्वतःला दूर ठेवले. यावर महुआ यांनीही टिप्पणी करत, पक्षाला पाठिंबा दिला आणि ही विधाने घृणास्पद असल्याचे म्हटले होते.

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMahua Moitraमहुआ मोईत्राtmcठाणे महापालिकाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस