'नरेंद्र मोदींनी कधीही चहा विकला नाही, प्रसारमाध्यमांच्या प्रचारामुळे पंतप्रधान झाले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 09:05 IST2018-12-25T08:52:09+5:302018-12-25T09:05:16+5:30

भाजपाचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

shatrughan sinha says modi government one man show mocks prime minister narendra modi and amit shah | 'नरेंद्र मोदींनी कधीही चहा विकला नाही, प्रसारमाध्यमांच्या प्रचारामुळे पंतप्रधान झाले'

'नरेंद्र मोदींनी कधीही चहा विकला नाही, प्रसारमाध्यमांच्या प्रचारामुळे पंतप्रधान झाले'

ठळक मुद्देभाजपाचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.आपण वैयक्तिकरित्या वन मॅन शो आणि टू मॅन आर्मीच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींनी कधीही चहा विकला नाही ते फक्त प्रसारमाध्यमांच्या प्रचारामुळे पंतप्रधान झाले अशी टीका सिन्हा यांनी केली आहे. 

तिरुवअनंतपुरम - भाजपाचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. आपण वैयक्तिकरित्या वन मॅन शो आणि टू मॅन आर्मीच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच नरेंद्र मोदींनी कधीही चहा विकला नाही ते फक्त प्रसारमाध्यमांच्या प्रचारामुळे पंतप्रधान झाले अशी टीका सिन्हा यांनी केली आहे. 

काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या ‘दी पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर, नरेंद्र मोदी अँड हिज इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (24 डिसेंबर) तिरुवनंतपुरम या ठिकाणी करण्यात आले. या कार्यक्रमाला  शत्रुघ्न सिन्हांनी हजेरी लावली होती. त्यावेळीही त्यांनी मोदी व त्यांच्या धोरणांवर टीका केली. 'मला अनेक लोक विचारतात तुम्ही कलाकार आहात, तुम्हाला नोटाबंदी आणि जीएसटीमधलं काय कळतं? जर वकील अनुभव नसताना आर्थिक मुद्द्यांवर बोलतो, टीव्हीवरची कलाकार केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री होते, एक चहा विकणारा माणूस… अर्थात मोदींनी कधीही चहा विकलाच नाही. मोदी फक्त मीडिया प्रचारावर पंतप्रधान झाले. ते जर काहीही बोलू शकतात तर मी नोटाबंदी किंवा जीएसटी या मुद्द्यांवर का बोलू शकत नाही?' असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे. 

'माझे नरेंद्र मोदींशी व्यक्तीगत शत्रुत्त्व नाही. मात्र वन मॅन शो आणि टू मॅन आर्मीला मी कंटाळलो आहे' असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. शशी थरुर यांनी या कार्यक्रमात शत्रुघ्न सिन्हा यांना काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रणच दिले. तुमचा सारखा नायक आम्हाला हवा आहे असे थरुर म्हटले. तसेच थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तम वक्ते आहेत. मात्र जेव्हा देशात एखाद्या दलित किंवा मुस्लिम व्यक्तीवर हल्ला होतो किंवा त्याला ठार केले जाते तेव्हा मात्र मोदी गप्प बसतात अशी टीका थरुर यांनी केली आहे.

Web Title: shatrughan sinha says modi government one man show mocks prime minister narendra modi and amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.