शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

शशी थरूरना काँग्रेसच्या प्रवक्तापदावरून हटवले

By admin | Updated: October 13, 2014 14:57 IST

नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाचे कौतुक करणे काँग्रेस नेते शशी थरूर यांना महागात पडले असून काँग्रेसच्या प्रवक्तापदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १३ - नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाचे कौतुक करणे काँग्रेस नेते शशी थरूर यांना महागात पडले असून काँग्रेसच्या प्रवक्तापदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदींचे केलेले कौतुक आणि थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू यामुळे थरूर अडचणीत सापडले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियानात ९ जणांना सहभागी करत त्यात शशी थरूर यांनाही स्थान दिले होते. थरूर यांनी ते निमंत्रण स्वीकारत मोदींनी आपली निवड करणं हा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र या घटनेवर केरळ काँग्रेसने नाराजी दर्शवली होती.  थरूर यांची मोदींवरील वक्तव्ये काँग्रेसच्या विचारसरणीच्या विरोधात असल्याचे पक्षाचे केरळमधील उपाध्यक्ष सूरनाद राजशेकरन यांनी सांगितले होते. मोदींची स्तुती बंद करा अशी तंबीही त्यांना देण्यात आली होती. मात्र आपण हिंदुत्वाच्या अजेंडाच्या बाजूचे नसल्याचे सांगत मोदींबाबतची माझी वक्तव्ये राजकीय नव्हे तर व्यक्तिगत टिपण्णी  आहेत, असे स्पष्टीकरण थरूर यांनी दिले होते. 
तर जानेवारी महिन्यात थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह दिल्लीतील एका हॉटेलमध्ये सापडला होता. त्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे नुकतेच समोर आले. या सर्व प्रकारांमुळे थरूर अडचणीत सापडले होते.