'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:52 IST2025-06-25T17:51:45+5:302025-06-25T17:52:19+5:30

Shashi Tharoor vs Congress: ऑपरेशन सिंदूरबाबत पीएम मोदींचे कौतुक केल्याबद्दल शशी थरुर यांच्यावर पक्षातूनच जोरदार टीका होत आहे.

Shashi Tharoor vs Congress: 'The wings are yours, but the sky belongs to everyone...', Shashi Tharoor's response to Congress President Kharge's criticism! | 'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!

'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!

Shashi Tharoor vs Congress: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी(दि.२५) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवअनंतपुरमचे खासदार शशी थरुर यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारंवार कौतुक केल्याबद्दल टीका केली. खरगेंच्या टीकेने थरुर आणि काँग्रेसमधील मतभेद उघड्यावर आले आहेत. दरम्यान, खरगेंच्या टीकेनंतर आता थरुर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे पलटवार केला. 

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?
आज पत्रकार परिषदेत बोलताना खरगे म्हणाले, "शशी थरुर यांचे इंग्रजी खूप चांगले आहे, म्हणूनच त्यांना काँग्रेस कार्यकारिणीत ठेवले आहे. मी गुलबर्गा येथे म्हटले होते की, आम्ही एका सुरात बोलतो, आम्ही देशासाठी एकत्र उभे राहतो. ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही एकत्र उभे राहिलो. आमच्यासाठी देश आधी येतो, पण काही लोकांसाठी मोदी आधी येतात, देश नंतर येतो," अशी बोचरी टीका खरगेंनी केली. 

शशी थरुर यांचा पलटवार
शशी थरुर यांनी आपल्या X पोस्टमध्ये इंग्रजीत एक संदेश शेअर केला, ज्याचा अर्थ, "उडण्यासाठी कुणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. पंख तुमचे आहेत, पण आकाश सर्वांचे आहे," अशाप्रकारची पोस्ट थरुर यांनी केली आहे. थरुर यांची पक्षावरील नाराजी याद्वारे स्पष्ट होते. 

थरुर यांची ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका 
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी काही शिष्टमंडळे परदेशात पाठवली होती. या शिष्टमंडळात शशी थरुर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेला भेट देणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना त्यांनी पंतप्रधान मोदींची आणि सरकारच्या धोरणांची तोंडभरुन स्तुती केली. अलीकडेच त्यांनी पंतप्रधान मोदींना भारताची प्रमुख संपत्ती, असेही म्हटले होते.

त्यामुळेच थरुर यांच्यावर पक्षातील अनेक नेत्यांनी टीका केल्या. सुरुवातीला थरुर यांनी या टीकांकडे दुर्लक्ष केले, मात्र आता पक्षाध्यक्ष खरगेंनी टीका केल्यामुळे थरुर यांनी पलटवार केला आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर शशी थरुर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही सुरू आहे.

Web Title: Shashi Tharoor vs Congress: 'The wings are yours, but the sky belongs to everyone...', Shashi Tharoor's response to Congress President Kharge's criticism!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.