शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनंतर शशी थरुर यांचाही राजीनामा; टीव्ही शो सोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 3:10 PM

तोपर्यंत टीव्ही शो होस्ट करणार नाही; काँग्रेस खासदार शशी थरुर यांचा राजीनामा

नवी दिल्ली: शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यानंतर आता काँग्रेस खासदार शशी थरुर यांनीदेखील सांसद टीव्हीचा कार्यक्रम सोडला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली. अधिवेशनाला सुरुवात होताच राज्यसभेच्या १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. त्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त करत थरुर यांनी सांसद टीव्हीवरील कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला.

जोपर्यंत १२ खासदारांचं निलंबन मागे घेतलं जात नाही, तोपर्यंत शो होस्ट करणार नाही, अशी भूमिका शशी थरुर यांनी घेतली आहे. लोकसभेत थिरुअनंतपुरम मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत असलेले थरुर सांसद टीव्हीवर 'टू द पॉईंट' कार्यक्रम होस्ट करतात.

'एका कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी संसद टीव्हीचं निमंत्रण स्वीकारणं लोकशाहीच्या सर्वोत्तम परंपरांपैकी एक होतं. आमच्यामध्ये राजकीय मतभेद असले तरीही संसदेचे सदस्य म्हणून विविध संसदीय संस्थांमध्ये सहभागी होण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही हेच यातून दिसलं. निलंबित खासदार करत असलेल्या आंदोलनाला पाठिबा म्हणून टू द पॉईंट कार्यक्रम सोडत आहे,' असं थरुर म्हणाले. खासदारांचं निलंबन मागे घेतल्यास कार्यक्रमात पुन्हा सहभागी होईन. जोपर्यंत निलंबन रद्द होत नाही, तोपर्यंत कार्यक्रम करणार नाही, असं थरुर यांनी सांगितलं.

सेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काल दिला राजीनामाराज्यसभेत गदारोळ केल्यानं १२ खासदारांना निलंबित करण्यात आलं. यामध्ये शिवसेना, काँग्रेस, तृणमूल आणि डाव्या पक्षाच्या खासदारांचा समावेश आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर चतुर्वेदींनी मोदी सरकारवर तोफ डागली होती. गुन्हेगारांना स्वत:ची बाजू मांडण्याची संधी मिळते. पण आम्हाला तीदेखील मिळाली नाही, अशा शब्दांत चतुर्वेदींनी नाराजी व्यक्त केली. 

चतुर्वेदींचं उपराष्ट्रपतींना पत्रआता खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला आहे. चतुर्वेदी सांसद टीव्हीच्या अँकर आहेत. राज्यसभेतून निलंबन करण्यात आल्यानंतर त्यांनी अँकरपदाचा राजीनामा दिला आहे. 'सांसद टीव्हीच्या मेरी कहानी कार्यक्रमाच्या अँकर पदावरून मी पायउतार होत आहे. संसदीय जबाबदाऱ्या पार पाडत असताना मनमानीपणे १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. मी खासदार म्हणून माझ्या कामाबद्दल कटिबद्ध आहे, तितकीच मी कार्यक्रमातील जबाबदाऱ्यांबद्दलदेखील कटिबद्ध आहे. त्यामुळे मी त्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेत आहे,' असं चतुर्वेदींनी उपराष्ट्रपतींना पाठवलेल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना