शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

शशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 1:52 PM

शशी थरुर यांनी केलेल्या ट्विटवर गीतकार जावेद अख्तर यांनी आक्षेप घेतला अन्...

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर कोणत्या-ना-कोणत्या कारणामुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. शशी थरूर यांनी प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांच्याबाबत एक ट्विट केले आहे. यावरुन सोशल मीडियात सध्या चर्चा सुरु आहे.

शशी थरूर यांनी ट्विटवर एक शेर पोस्ट करत मिर्झा गालिब यांची असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी ट्विटवर लिहिले की, आज प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांची 220 जयंती आहे. यानंतर शशी थरूर यांनी केलेल्या ट्विटवर गीतकार जावेद अख्तर यांनी आक्षेप घेत चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर शशी थरूर यांनी आपली चूक सुधारली. 

जावेद अख्तर यांनी ट्विटरवर लिहिले की, 'शशी जी, ज्यांनी तुम्हाला या ओळी दिल्या आहेत, त्यांच्यावर परत कधीही विश्वास ठेवू नये.  हे स्वाभाविक आहे की, कोणीतरी आपल्या पोस्टमध्ये या ओळी घातल्या असतील. मात्र, असे करुन त्यांनी आपल्या बौद्धिक विश्वासर्हातेला धक्का पोहोचवला आहे.'

जावेद अख्तर यांच्या ट्विटनंतर शशी थरूर यांनी ट्विट केले. ते म्हणाले,' माझ्याकडून काय झाले होते, त्याबद्दल जाणीव करुन दिल्याबद्दल जावेदजी आणि अन्य मित्रांचे आभार. ज्याप्रकारे प्रत्येक प्रत्येक कोटला विन्स्टन चर्चिलच्या नावे समर्पित केले जाते, त्याचप्रकारे वाटते की, ज्यावेळी लोक शायरी पसंद करतात. त्यावेळी त्याचे श्रेय गालिब यांना देतात. मी माफी मागतो.' 

आणखी एका ट्विटमध्ये शशी थरूर यांनी लिहिले की, 'गालिब नेहमी आपल्या सर्वांच्या आवडीचे आहेत. आज त्यांचा जन्मदिवस नाही आहे. मला चुकीची माहिती दिली होती. तरी पण ओळींची मजा घ्या.'

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरTwitterट्विटरJaved Akhtarजावेद अख्तरSocial Mediaसोशल मीडिया