शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शरिया बँकेबाबत अभिप्राय गुप्तच!

By admin | Updated: February 28, 2017 04:13 IST

देशात मुस्लिमांसाठी शरिया बँक सुरू करण्याच्या मुद्द्यावर रिझर्व्ह बँकेने तयार केलेल्या अहवालावर केंद्र सरकारने दिलेला अभिप्राय जाहीर केला जाऊ शकत नाही

नवी दिल्ली : देशात मुस्लिमांसाठी शरिया बँक सुरू करण्याच्या मुद्द्यावर रिझर्व्ह बँकेने तयार केलेल्या अहवालावर केंद्र सरकारने दिलेला अभिप्राय जाहीर केला जाऊ शकत नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.देशात इस्लामिक बँक सुरू करण्याच्या हालचाली मोदी सरकारने चालविल्या असल्याच्या बातम्या काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने यासंबंधी एक अहवाल तयार केला आहे. या अहवालावर केंद्रीय वित्त मंत्रालयाने आपला अभिप्राय बँकेला कळविला आहे. हा अभिप्राय नेमका काय आहे, याची माहिती एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागितली होती. रिझर्व्ह बँकेच्या अंतर विभागीय समूहाच्या शिफारशींवर वित्त मंत्रालयाच्या पत्राची प्रतच माहिती अधिकारात मागण्यात आली होती. त्यावर रिझर्व्ह बँकेने वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाकडून आदेश मागितले होते. हे पत्र माहिती अधिकारांतर्गत खुले करावे का, अशी विचारणा रिझर्व्ह बँकेने केली होती. हे पत्र खुले करण्याची गरज नाही, असे वित्तीय सेवा विभागाने रिझर्व्ह बँकेला कळविले आहे.बँकेने माहिती अधिकाराच्या अर्जाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, हे पत्र सामायिक न करणे आवश्यक आहे. कायद्याच्या कलम ८ ( १) नुसार त्याला सूट मिळालेली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>...तर विशेषाधिकाराचे हनन होईलराज्य विधानसभा आणि संसदेच्या विशेषाधिकाराचे हनन होऊ शकेल, अशा बाबी जाहीर करण्यावर या कलमान्वये बंदी आहे. इस्लामिक आणि शरिया बँक अशी वित्तप्रणाली आहे, जी व्याज न घेण्याच्या सिद्धांतावर काम करते. व्याज घेण्यावर इस्लाममध्ये बंदी आहे. या तत्त्वावर चालणारी बँक सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती असून, त्यानुसारही माहिती अधिकारात अर्ज देण्यात आला होता.