शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शालक-मेहुण्याची पुन्हा बनवाबनवी उघड कारागृहात रवानगी : औरंगाबाद व पालघर नव्हे तर नागपूर, मुंबई शहर येथे केले अर्ज

By admin | Updated: April 1, 2016 22:53 IST

जळगाव : जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनवाबनवी करणार्‍या शालक व मेहुण्याची शुक्रवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. दरम्यान, या दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. सुरुवातीला पालघर व औरंगाबाद ग्रामीण येथे भरतीसाठी अर्ज केल्याचे दोघांनी सांगितले होते. परंतु पोलीस तपासात त्यांनी नागपूर कारागृह व मुंबई शहर याठिकाणी अर्ज केल्याचे समोर आले आहे.

जळगाव : जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनवाबनवी करणार्‍या शालक व मेहुण्याची शुक्रवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. दरम्यान, या दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. सुरुवातीला पालघर व औरंगाबाद ग्रामीण येथे भरतीसाठी अर्ज केल्याचे दोघांनी सांगितले होते. परंतु पोलीस तपासात त्यांनी नागपूर कारागृह व मुंबई शहर याठिकाणी अर्ज केल्याचे समोर आले आहे.
आरोपी रामचंद्र कपूरचंद भवरे (२९, रा.जोडवाडी कचनेर, ता.जि. औरंगाबाद) व केसरसिंग इंदरसिंग घुशिंगे (१९, रा.जोडवाडी, ता.जि.औरंगाबाद) या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्यांना जिल्हापेठ पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. सरकार पक्षातर्फे ॲड.हेमंत मेंडकी यांनी कामकाज पाहिले.
पोलीस तपासात कागदपत्रे जप्त
जिल्हापेठ पोलिसांनी दोघांकडून, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस शिपाई भरतीचा चेस्ट क्रमांकाचे कार्ड, मुंबई पोलीस शिपाई भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र, आवेदन अर्ज, नागपूर पोलीस शिपाई भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र, आवेदन अर्ज अशी कागदपत्रे आरोपींच्या घरी जोडवाडी येथे जाऊन जप्त केली. आरोपींनी चित्ते पिंपळगाव, ता.जि.औरंगाबाद येथील सिद्धी विनायक कॉम्प्युटर्सचे मालक व चालक कैलास उखर्डू मोरे यांच्याकडून संगणकाच्या साहाय्याने भरलेले आहेत. पोलिसांनी तेथे जाऊन सर्व साहित्य जप्त केले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येतात. एका उमेदवाराला राज्यात एकाच ठिकाणी अर्ज करता येत असताना आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे.