शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

Shailja Murder Case: फेसबूकवर तिला पाहून मेजर पडला प्रेमात, जवळीक वाढवण्यासाठी पतीशी केली मैत्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 2:02 PM

दिल्लीत गाजत असलेल्या शैलजा द्विवेदी हत्या प्रकरणामध्ये आता नवी माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली  - दिल्लीत गाजत असलेल्या शैलजा द्विवेदी हत्या प्रकरणामध्ये आता नवी माहिती समोर आली आहे.  या प्रकरणात आरोपी असलेला मेजर हांडा याचे फारसे मित्र नव्हते. मात्र सोशल मीडियावर तो खूप अॅक्टिव्ह असायचा. त्याचदरम्यान त्याने फेसबूकवर शैलजाचा फोटो पाहिला आणि तो तिच्या प्रेमात पडला. मग शैलजा हिच्याची जवळीक करण्यासाठी तिच्या पतीसोबत त्याने मैत्री केली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी सांगितले की, 2015 साली मेजर निखिल हांडा याने शैलजा हिचा फोटो आपल्या कॉमन मित्राच्या टाइमलाइनवर पाहिला होता. तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. नंतर तिच्याशी जवळीक करण्यासाठी हांडा याने शैलजाचा पती मेजर अमित द्विवेदी याच्याशी मैत्री केली. त्यानंतर हांडा याचे द्विवेदी यांच्या नागालँडमधील घरी येणे जाणे सुरू झाले. त्याचदरम्यान मेजर द्विवेदी यांना हांडा आणि त्यांच्या पत्नीच्या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ सापडला. संतापलेल्या मेजर द्विवेदी यांनी हांडा याला आपल्या घरी न येण्याची ताकीद दिली. मात्र नंतरही शैलजाशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरूच होते. मेजर अमित द्विवेदी आणि शैजला यांचा घटस्फोट व्हावा आणि शैलजासोबत आपल्याचा नवे जीवन सुरू करता यावे यासाठी तो प्रयत्नशील होता.शनिवारी दुपारी बराड स्क्वेअर परिसरात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिली होती. सुरुवातीचे काही तास या मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती. मात्र संध्याकाळी साडे चारच्या सुमारास मेजर अमित द्विवेदी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती दिल्यावर हा मृतदेह शैलजाचाच असल्याचं निष्पन्न झालं. 

टॅग्स :Crimeगुन्हाNew Delhiनवी दिल्लीMurderखूनSocial Mediaसोशल मीडिया