शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

शाहनवाज मुल्ला कबड्डी पंच परीक्षेत उत्तीर्ण

By admin | Updated: July 1, 2014 21:43 IST

उत्तर सोलापूर: महाराष्ट्र राज्य कबड्डी असो़च्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पंच परीक्षेमध्ये शाहनवाज अब्दुलगनी मुल्ला हे उत्तीर्ण झाले आहेत़ ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गणेशनगर कोंडी तांडा येथे शिक्षक असून, त्यांनी खो-खो, मैदानी, कबड्डी स्पर्धेत जिल्हास्तरीय व राज्यस्तरावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल़े

अकोला : राज्यातील खाजगी कृषी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातून परप्रांतीय विद्यार्थ्यांना सर्रास प्रवेश दिला जात असून, या प्रवेशापोटी त्या विद्यार्थ्यांकडून लाखो रू पये डोनेशन घेतले जात आहे. या प्रकारामुळे कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विदर्भ, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.
राज्य शासनाने कृषी विद्यापीठांतर्गत नवीन कृषी महाविद्यालये सुरू केली असून, जागादेखील वाढविल्या आहेत. तसेच खासगी कृषी महाविद्यालयांनाही अनुमती दिली आहे. राज्यात आजमितीस ६४ खासगी कृषी महाविद्यालये आहेत. यात सात उद्यानविद्या, १६ जैवतंत्रज्ञान व आठ कृषी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यातील विदर्भात १६ कृषी, दोन उद्यानविद्या, एक जैवतंत्रज्ञान व एक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषदेकडे (एमसीईएआर) ऑनलाइन अर्ज भरावे लागतात. एमसीईएआरकडून या अर्जाची गुणवत्ता यादी तयार केली जाते. तीन टक्के जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार इतर राज्यातील विद्यार्थ्यांकरीता राखीव असतात. २० टक्के जागांवर व्यवस्थापन समितीव्दारे प्रवेश दिला जातो. त्यासाठी एसीएईआरच्या यादीत विद्यार्थ्यांचे नाव असणे अनिवार्य असते. म्हणूनच जो तीन टक्के केंद्रीय पद्धतीने प्रवेश दिला जातो, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ घातला जात आहे. या विद्यार्थ्यांकडून लाखो रू पये डोनेशन घेऊन प्रवेश दिला जात असल्याचा आरोप विदर्भ, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. (प्रतिनिधी)
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
कोट
खाजगी कृषी महाविद्यालयामध्ये २० टक्के व्यवस्थापन कोटा आहे. या कोट्यातून परप्रांतीय विद्यार्थ्यांचा भरणा केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यात हे प्रमाण जास्त आहे. या संदर्भात प्रत्येक महाविद्यालयाकडून प्रवेश यादी मागविली आहे.
- डॉ. व्ही.एम. भाले, अधिष्ठाता कृषी,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
कोट
कृषी महाविद्यालयांना २० टक्के व्यवस्थापन कोटा दिला आहे. त्यामधून हा प्रकार सुरू आहे. असे असले तरी राज्यात कृषी अभ्यासक्रमाच्या जागा वाढविल्या आहेत, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही.
- ॲड़ विजय कोलते, माजी उपाध्यक्ष , एमसीईएआर, पूणे