शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन पत्नीशी ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कारच, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 13:28 IST

अल्पवयीन पत्नीशी ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कारच आहे, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. अल्पवयीन पत्नीशी शारीरिक संबंधांबाबत निर्णय घेत सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

नवी दिल्ली - अल्पवयीन पत्नीशी ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कारच आहे, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. अल्पवयीन पत्नीशी शारीरिक संबंधांबाबत निर्णय घेत सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या निर्णयामुळे 18 वर्षांखालील मुलीशी विवाह करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणे हा यापुढे बलात्कार ठरणार आहे. 

 पति-पत्नीमधील सहमतीने शारीरिक संबंधांसाठीचे वय वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. याविषयी आपले मत व्यक्त करताना  केंद्र सरकारने बालविवाह हे भारतातील वास्तव असून, विवाहसंस्थेचे रक्षण झाले पाहिजे, असे उत्तर दिले होते.   मात्र सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत 15 ते 18 वर्षांपर्यंतच्या पत्नीशी शरीरसंबंध ठेवणे हा सुद्धा भारतीय दंडविधानानुसार दंडनीय अपराध असल्याचा निकाल दिला. तसेच देशात होत असलेल्या बालविवाहांबाबतही सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. सामाजिक न्यायासाठी ज्या भावनेने कायदे बनवण्यात आले होते. त्या भावनेने त्यांची अमलबजावणी झाली नाही. अशी खंत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली.   कायद्यानुसार भारतात विवाहासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तर मुलांसाठी वयाची 21 वर्षे पूर्ण असण्याची अट आहे. मात्र काही अपवादात्मक परिस्थितीत बालविवाहाला आणि शरीरसंबंधांना मान्यता देण्यात आली आहे.  आपल्या कायद्यात बालविवाह होऊनही पती आणि पत्नी म्हणून संबंध प्रस्थापित झाल्यास त्याला कायदेशीर मान्यता दिली जाते. विशेष म्हणजे सहमतीने शारिरीक संबंध ठेवण्यासाठीही वयाची 18 वर्ष पुर्ण असण्याचं बंधन आहे. पण जर मुलगी अल्पवयीन असेल तर तो बलात्कार समजला जातो. पण जेव्हा हीच गोष्ट लग्नाशी जोडले जाते, तेव्हा 15 वर्षाच्या पत्नीसोबत सेक्स करणं अपराध मानलं जात नाही. 

 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRapeबलात्कारCrimeगुन्हाIndiaभारत