शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार, विद्यार्थ्यिनीने घेतले स्वत:ला जाऴून

By Admin | Updated: October 30, 2015 17:59 IST2015-10-30T17:42:18+5:302015-10-30T17:59:56+5:30

शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार झाल्याने येथील एका १४ वर्षीय विद्यार्थीनींने स्वत:ला जाऴून घेण्याची धक्कादायक

Sexual harassment from the teacher, student woke up himself | शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार, विद्यार्थ्यिनीने घेतले स्वत:ला जाऴून

शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार, विद्यार्थ्यिनीने घेतले स्वत:ला जाऴून

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. २९ -  शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार झाल्याने येथील एका १४ वर्षीय विद्यार्थ्यिनीने स्वत:ला जाऴून घेण्याची धक्कादायक गेल्या आठवड्यात घडली. 
येथील कुरनूल जिल्ह्यातील बनागानपल्ली मंडाल येथील एका खाजगी शाळेत शिकणा-या आठवीच्या विद्यार्थ्यिनीवर शाऴेतील शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार झाल्यामुळे तिने स्वत:ला जाळून घेण्याची घटना गेल्या आठवड्यात २१ ऑक्टोबरला घडली. विद्यार्थ्यिनीने स्वत:ला जाऴून घेतल्यानंतर तिला तिच्या कुटुंबियांनी लगेचच रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तिच्यावर आठवडाभर उपचार सुरु होते. मात्र या दुर्घटनेत तिला जास्त भाजल्याने तिचा काल मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी तिच्या वडिलांनी त्या शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 
अब्दुल्ला असे या शिक्षकाचे नाव असून त्याने याआधीही या विद्यार्थ्यिनीचा लैंगिक छळ केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अब्दुला याच्यावर शाळेच्या व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई केली आहे. सध्या अब्दुल्लावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचे पोलीसांनी सांगितले. 
 

 

Web Title: Sexual harassment from the teacher, student woke up himself