अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार
By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:40+5:302015-09-03T23:05:40+5:30
पुणे : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या एकाला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. त्याला विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार
प णे : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या एकाला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. त्याला विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सोमनाथ गोविंद कांबळे (वय २५, रा. माळवाडी, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपी कांबळे हा आयकर विभागाच्या उपायुक्तांच्या गाडीवर चालक पदावर नोकरीस आहे. आरोपीने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवत २८ ऑगस्ट रोजी तिचे अपहरण केले. सरकारी वकील लीना पाठक यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली.