श्रीनगर-लेह महामार्गावर भीषण हिमस्खलन, ६ ते ८ गाड्या बर्फात अडकल्या, २ जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 19:49 IST2026-03-27T19:48:48+5:302026-03-27T19:49:20+5:30
Avalanche on Srinagar-Leh highway: काश्मीरमधील सोनमर्ग येथे शुक्रवारी अचानक झालेल्या हिमस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना श्रीनगर-लेह महामार्गावरील जोजिला पास जवळील झीरो पॉईंट परिसरात घडली आहे. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे.

श्रीनगर-लेह महामार्गावर भीषण हिमस्खलन, ६ ते ८ गाड्या बर्फात अडकल्या, २ जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याचा मृत्यू
काश्मीरमधील सोनमर्ग येथे शुक्रवारी अचानक झालेल्या हिमस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना श्रीनगर-लेह महामार्गावरील जोजिला पास जवळील झीरो पॉईंट परिसरात घडली आहे. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजणांना वाचवण्यात आलं आहे. अचानक झालेल्या हिमस्खलनामुळे ६ ते आठ गाड्या बर्फाखाली दबल्याने या ठिकाणी अजून अनेक जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
श्रीनगरवरून कारगिल आणि लेहच्या दिशेने वाहनांचा एक ताफा जात असतानाच जोजिला पास येथील झीरो पॉईंटजवळ अचानक पर्वतावरून बर्फाचा एक मोठा तुकडा खाली कोसळला. तसेच या बर्फाखाली अनेक वाहने सापडली.
या दुर्घटनेच्या प्राथमिक माहितीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. तर इतर अनेकजण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर गांदरबल पोलीस आणि इतर आपत्तीव्यवस्थापन एजन्सींनी मोठ्या प्रमाणात बचाव अभियान सुरू केलं आहे.