कोलकाता: प. बंगालमध्ये मालदा जिल्ह्यात मतदारयाद्यांतून नावे काढून टाकल्याच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या जमावाने बुधवारी सायंकाळी सात निवडणूक निरीक्षकांना घेराव घालत ओलीस ठेवले. यात तीन महिलांचा समावेश होता. या जमावाने सुमारे ९ तास अधिकाऱ्यांना घेरले. स्थानिक पोलिस व सुरक्षा दलांच्या मदतीने अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली. निवडणूक निरीक्षकांच्या सुटकेसाठी सुरक्षा दलांनी लाठीमार केला.
नेमके प्रकरण काय?
मतदारयाद्यांच्या पुनरीक्षणादरम्यान २८ फेब्रुवारी रोजी प्रकाशित याद्यांत ज्या मतदारांची नावे 'विचाराधीन' ठेवण्यात आली आहेत त्याची तपासणी करण्यासाठी या निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या निरीक्षकांनाच जमावाने घेरले होते.
सीबीआय चौकशीचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणी सीबीआय व एनआयए अशा स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले. प्रशासनाचे अपयश दिसते, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
Web Summary : Seven election observers, including three women, were held hostage in West Bengal's Malda district by protestors. They were surrounded for nine hours before being rescued by police. The Supreme Court has ordered a CBI and NIA inquiry into the incident, expressing dissatisfaction with the administration's handling.
Web Summary : पश्चिम बंगाल के मालदा जिले में प्रदर्शनकारियों ने सात चुनाव पर्यवेक्षकों को बंधक बना लिया, जिनमें तीन महिलाएं शामिल थीं। पुलिस द्वारा बचाए जाने से पहले उन्हें नौ घंटे तक घेरा गया। सुप्रीम कोर्ट ने सीबीआई और एनआईए जांच का आदेश दिया, प्रशासन से असंतुष्टि व्यक्त की।