A separate forum for Vasundhara Raje supporters in Rajasthan | वसुंधरा राजे समर्थकांचा राजस्थानात वेगळा मंच

वसुंधरा राजे समर्थकांचा राजस्थानात वेगळा मंच

जयपूर : राजस्थानमध्ये भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून राज्याच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांच्या समर्थकांनी स्वतंत्र गट स्थापन केला करून पक्ष नेतृत्वाला धक्का दिला आहे.

राजे समर्थकांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘टीम वसुंधरा राजे’ या नावाने वेगळा गट स्थापन केला. त्यामध्ये २५ जिल्हाध्यक्षांची घाेषणाही करण्यात आली असून ही यादी साेशल मीडियामध्ये व्हायरल करण्यात आली. विशेष म्हणजे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासाेबत राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया, विराेधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया आणि उप विराेधी पक्षनेते राजेंद्र राठाेड यांची बैठक सुरू असतानाच या घडामाेडी घडल्या. या बैठकीसाठी वसुंधरा राजे यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. राजे यांना हळूहळू बाजूला सारण्याचे काम सुरू असल्याचा आराेप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. राजस्थानमध्ये तीन जिल्ह्यांमध्ये पाेटनिवडणूक हाेणार आहे. या नव्या समीकरणामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना माेठा धक्का बसला आहे. वसुंधरा राजे समर्थक मंच या नावाने या नावाने हा गट स्थापन करण्यात आला आहे. त्याचे समन्वयक विजय भारद्वाज यांनी सांगितले, की २०२३ मध्ये भाजपला पुन्हा सत्तेत आणायचे असून, राजे यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी काम करायचे आहे.

सावध प्रतिक्रिया
प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, की या घडामाेडींबाबत आम्ही वरिष्ठ नेत्यांना कल्पना दिली आहे. या गटाचे सदस्य खराेखर भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत का, याबाबत माहिती घेण्यात येत आहे. सविस्तर अहवाल तयार केल्यानंतरच स्पष्टता येईल.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A separate forum for Vasundhara Raje supporters in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.