नवी दिल्ली, दि. 4 - दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. काश्मीर खो-यात दहशतवादी कारवाया करणा-या संघटनांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी फुटीरतावादी नेत्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली होती. यामध्ये फुटरतावादी आणि हुर्रियत संघटनेचे नेते एस.ए. एस. गिलानी यांच्या जावयासह सात जणांना समावेश आहे. अलताफ शाह, अयाझ अकबर, पीर सैफुल्लाह, मेहराज, शाहिद-उल-इस्लाम, नईम खान आणि फारूक अहमद दार उर्फे बिट्टा कराटे, अशी या फुटीरवाद्यांची नावे आहेत. दरम्यान, दिल्लीत पटियाला कोर्टात राष्ट्रीय तपास संस्थेने या सात जणांना आज हजर केले असता, कोर्टाने त्यांच्या कोठडीत दहा दिवसांची वाढ केली आहे. यामधील तिघांना न्यायालयीन तर चौघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी फुटीरवाद्यांच्या कोठडीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 15:29 IST